Clay Pot Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Clay Pot Demand: पिंपरी-चिंचवडमध्ये तापमानवाढ; मातीच्या माठांना वाढती मागणी

फेब्रुवारीतच उन्हाचा चटका; फ्रिजऐवजी माठातील पाण्याला नागरिकांची पसंती

पुढारी वृत्तसेवा

खराळवाडी: उन्हाळा सुरू होण्यास वेळ असतानाच फेब्रुवारी महिन्यातच बदलत्या हवामानाने पिंपरी शहर, उपनगरातील काही भागांत तापमानवाढीची चाहूल लागली आहे. सध्या ऊन, वार आणि ढगाळ वातावरणामुळे वातावरणात गर्मी वाढली आहे. उन्हाळ्यात ताहन भागविण्यासाठी नागरिक थंड पाणी पिण्यास पसंती देत आहेत. परंतु, फ्रिजपेक्षा मातीच्या माठातील पाणी आरोग्यास चांगले असल्याने शहर व उपनगरांमध्ये माठांना मागणी वाढली आहे.

सध्या उन्हाचा चटका जाणवू लागल्याने शहर व उपनगर परिसरातील नागरिकांनी उन्हापासून बचाव करण्यासाठी मातीचे माठ खेरेदीला आतापासूनच सुरुवात केली आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड शहरात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली असून पिंपरी शहर उपनगरातील काही भागात व आजूबाजूच्या परिसरातही अशाच प्रकारे तापमानात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

पिंपरी शहरांतील कमाल तापमान रविवारी साधारण 30 ते 35 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. सकाळी काही प्रमाणात वाहणारे वारे रविवारी दुपारी 12 वाजता स्थिर झाले. त्यामुळे तापमान वाढले नाही. मात्र, खराळवाडी, नेहरूनगर, संत तुकारामनगर, वल्लभनगर, मोरवाडी, लालटोपीनगर, मासुळकर कॉलनी, अजमेरा, वास्तूउद्योग, यशवंतनगर परिसरात तापमानात वाढ झाल्याने सध्या उन्हाळ्याची चाहूल व चटका जानवत आहे. मार्च-एप्रिल महिन्यांत जाणवणारे उन्हाचे चटके फेब्रुवारीच्या महिन्याच्या शेवटी व मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच जाणवत आहेत. या मातीच्या माठात थंड पाणी लवकर होते. काळे रंगाचे माठ काळ्या मातीपासून तयार केल्यामुळे ते काळे रंगाचे माठ म्हणून बाजारपेठेत खरेदीसाठी विक्रीसाठी ठेवले जातात.

माठांचे प्रकार

काळे रंगाचे माठ, राजस्थानी गोलाकृती माठ, साधे माठ, लाल रंगाचे माठ, नळाचे माठ, बिगरनळाचे माठ, बाटली, रांजन.

माठाच्या किमती

  • साधा माठ एक हंड्याचा 300 ते 350, 375 रुपये.

  • दोन हंड्यांचा माठ 400 ते 450 रुपये.

  • राजस्थानी माठ 500 ते 600 रुपये.

  • लाल माठ 350 ते 400 रुपये.

  • बिगर नळाचा माठ 280 ते 300 रुपये.

  • नळाचा माठ 300 ते 500 रुपये.

  • मातीची बाटली 200 ते 250 रुपये.

  • रांजन 300 ते 700 रुपये.

लाल रंगाचा माठ हे भट्टीमध्ये भाजल्यामुळे ते लाल रंगाचे दिसतात व वजनाला हलके असतात. या लाल रंगाच्या माठात नैसर्गिकरीत्या पाणी लवकर थंड होते. म्हणून सध्या बाजारात या मातीच्या माठाला ग्राहकांची मागणी वाढली आहे.
तुकाराम कुंभार, विक्रेते

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT