Police Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Police Transfers: पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात १२ नव्या निरीक्षकांची एन्ट्री; सहा निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

राज्यभरातील १५० पोलिस निरीक्षकांच्या विनंती बदल्यांचे आदेश; दोन निरीक्षकांची रायगड, नवी मुंबईला बदली

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: राज्य पोलिस दलातील पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांमध्ये पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या ताफ्यात १२ नव्या निरीक्षकांची भर पडली आहे. राज्यातील विविध पोलिस घटकांत कार्यरत असलेल्या या अधिकाऱ्यांची पिंपरी-चिंचवडमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. दुसरीकडे, आयुक्तालयातील दोन निरीक्षकांची रायगड आणि नवी मुंबई येथे बदली झाली आहे. याचबरोबर आयुक्तालयाच्या स्तरावर सहा पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्यांचेही आदेश काढण्यात आले आहेत.

राज्य पोलिस दलातील एकूण १५० पोलिस निरीक्षकांच्या विनंती बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले. त्यानुसार, दहशतवाद विरोधी पथक मुंबई येथील प्रशांत आरदवाड, धाराशिव येथील हेमंत कदम, पुणे शहर येथील रवींद्र कदम, गुन्हे अन्वेषण विभाग पुणे येथील सिद्धराम म्हेत्रे व विजयकुमार शिंदे, पोलिस प्रशिक्षण केंद्र खंडाळा येथील देवेंद्र चव्हाण, मुंबई शहर येथील सुरेखा घार्गे, नांदेड येथील चंद्रकांत जाधव, ठाणे शहर येथील राजेंद्र निकाळजे व गोताराम शेवाळे, छत्रपती संभाजीनगर शहर येथील सोमनाथ जाधव आणि पोलिस प्रशिक्षण केंद्र सोलापूर येथील अमोल गवळी यांची पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात बदली करण्यात आली आहे.

रवींद्र कदम यांची यापूर्वी पोलिस प्रशिक्षण केंद्र, सोलापूर येथे बदली आदेशाधीन होती. नव्या बदली आदेशानुसार त्यांची आता पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात नियुक्ती झाली आहे. दरम्यान, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील निरीक्षक प्रदीप रायण्णावर यांची रायगड येथे, तर शत्रुघ्न माळी यांची नवी मुंबई येथे बदली करण्यात आली आहे.

सहा निरीक्षकांना नवीन जबाबदारी

राज्यस्तरीय बदल्यांबरोबरच पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातही सहा निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. संतोष पाटील यांची तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यातून गुन्हे शाखेत, तर अर्जुन घोडे पाटील यांची निगडी पोलिस ठाण्यातून गुन्हे शाखेत नियुक्ती करण्यात आली आहे.

विजयानंद पाटील यांची पिंपरी पोलिस ठाण्यातून तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. नियंत्रण कक्षातील नरेंद्र ठाकरे यांना गुन्हे शाखेत, तर प्रदीप पाटील यांना वाहतूक शाखेत पाठविण्यात आले आहे. गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या तेजस्विनी कदम यांची वाहतूक शाखेत बदली करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT