मिलिंद कांबळे
पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी 11 माजी नगरसेवकांसह एकूण 23 पदाधिकारी भाजपच्या गळाला लागले आहेत. त्याचा राष्ट्रवादी काँग््रेासवर काही परिणाम झाला नसल्याचे दिसत आहे. उलट, नगरपालिका निवडणुकीत पुणे जिल्ह्यातील 17 पैकी 10 नगराध्यक्ष राष्ट्रवादीचे आहेत. त्यामुळे अजित पवारांचा करिश्मा अद्याप कायम असल्याचे स्पष्ट होत आहे. त्या विजयामुळे राष्ट्रवादी अभी जिंदा है, असा नारा देण्यात येत असून, नगरपालिकेप्रमाणेच पिंपरी-चिंचवड महपाालिका पुन्हा ताब्यात घेणार असा दावाही पदाधिकाऱ्यांकडून केला जात आहे.
राज्यात सत्तेस असलेल्या महायुतीतील भाजपने मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग््रेासचे माजी नगरसेवक फोडत त्यांना पक्षात घेतले. त्यामुळे राष्ट्रवादीला भूकंपाचा धक्का बसल्याचा दावा भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला. मात्र, जे 11 माजी नगरसेवक भाजपात गेलेत, त्यांना निवडून येण्याची शाश्वती नव्हते. त्यातील बहुतेक माजी नगरसेवक हे मागील फेबुवारी 2017 च्या निवडणुकीत पराभूत झाले होते. राजकीय स्वार्थासाठी त्यांच्यावर पक्ष बदलण्याची वेळ आली, असा आरोप राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे.
पुणे जिल्हात नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग््रेासला मोठा विजय मिळाला आहे. एकूण 17 पैकी 10 नगराध्यक्ष राष्ट्रवादीचे आहेत. या विजयानंतर पक्षाचे सर्वेसर्वा तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका ताब्यात घेणार त्यासाठी सर्वस्व पणाला लावणार असल्याचे जाहीर केले आहेत. नगरपालिका विजयामुळे राष्ट्रवादीचा उत्साह वाढला आहे. भाजपने ज्या प्रभागात राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना प्रवेश दिला आहे. तेथील भाजपचे माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. वेगवेगळ्या प्रकाराचे आंदोलन करीत आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली जात आहे. पक्षाच्या या घाऊक प्रवेशावरून निष्ठावंत कार्यकर्ते रोष व्यक्त करीत आहेत.
भाजपच्या घाऊक पक्षप्रवेशाला उत्तर म्हणून भाजपाचे पिंपरी गावातील माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांना अजित पवारांनी राष्ट्रवादीत प्रवेश दिला आहे. तसेच, शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे उपशहर प्रमुख राजेश आरसूळ, त्यांच्या पत्नी मनीषा आरसूळ आणि आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यावरून राष्ट्रवादीचा करिश्मा अद्याप टिकून असल्याचे स्पष्ट होत आहे. तसेच, येत्या काही दिवसांत भाजपवर नाराज असलेल्या माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे पदाधिकाऱ्यांना वादा केला जात आहे. परिणामी, राष्ट्रवादी काँग््रेास दिवसेंदिवस अधिक मजबूत होत आहे. तसेच, पक्षाकडे अनेक दिग्गज व अनुभवी माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची फळी असून, कोणत्याही परिस्थितीत महापालिका पुन्हा काबीज करण्याचा निर्धार राष्ट्रवादी काँग््रेासने केला आहे. त्यादृष्टीने सावध पावले टाकले जात असून, राष्ट्रवादी अभी जिंदा है, असा नारा सोशल मीडियाद्वारे दिला जात आहे.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचाली
अजित पवार आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग््रेास पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी एकत्र येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यादृष्टीने दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून सकारात्मक पावले पडत आहेत. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद आणखी वाढणार आहे. शहरात शरद पवार यांना मानणारा वर्ग मोठा असून, त्यांचा करिश्मा कायम आहे. त्यांची जाहीर सभा झाल्यानंतर शहराचे चित्र पलटू शकते. त्यामुळे राष्ट्रवादीला हलक्यात घेणे भाजपला महागात पडू शकते, असा अंदाज बांधण्यात येत आहे.