PCMC Budget Pudhari
पिंपरी चिंचवड

PCMC Budget: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अर्थसंकल्पावर उपसूचनांचा पाऊस

9 वर्षांनंतर निवडणूक झाल्याने नगरसेवकांचा जोर; स्थायी समितीकडे आतापर्यंत 80 उपसूचना

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सन 2026-27 चा अर्थसंकल्पास स्थायी समितीकडून सोमवारी (दि.16) होणाऱ्या विशेष सभेत उपसूचना दिल्या जाणार आहेत. तब्बल 9 वर्षांनंतर निवडणूक झाल्याने अर्थसंकल्पास पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकांकडून उपसूचनांचा भडिमार केला जाऊ शकतो.

महापालिकेचा सन 2026-27 चा अर्थसंकल्प आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे यांच्याकडे 28 फेब्रुवारीला सादर केला. त्यावर चर्चा करून स्थायी समितीकडून येत्या सोमवारी सकाळी अकरा होणाऱ्या विशेष सभेत उपसूचना दिल्या जाणार आहेत. स्थायी समितीकडे अनेक नगरसेवकांनी प्रभागातील नवीन कामांसाठी उपसूचना दिल्या आहेत. आतापर्यंत एकूण 80 उपसूचना प्राप्त झाल्याचे समजते.

निवडणूक काळात नगरसेवकांनी प्रभागात विविध कामे करण्याचे आश्वासन नागरिकांना दिले होते. त्या कामांचा अर्थसंकल्पात समावेश करून आवश्यक निधीची तरतूद मिळावी, यासाठी पदाधिकार्यांसह नगरसेवकांची धडपड सुरू आहे. मात्र, महापालिकाची आर्थिक स्थिती समाधानकारक नसल्याने अनेक नवीन कामांना आयुक्तांनी अर्थसंकल्पात स्थान दिलेले नाही. तसेच, पुरेशा निधीची तरतूद केलेली नाही. त्यामुळे पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.

शहराच्या प्रगतीसाठी आवश्यक कामांचा अर्थसंकल्पात समावेश केला जावा, असा पदाधिकाऱ्यांचा आग्रह आहे. त्यामुळे अर्थसंकल्पास मोठ्या संख्येने उपसूचना दिल्या जाण्याची दाट शक्यता आहे. त्यादृष्टीने स्थायी समितीकडे उपसूचना दिल्या जात आहेत. त्यातील किती उपसूचना स्वीकारल्या जातात आणि किती फेटाळल्या जातात, याकडे लक्ष लागले आहे.

निधी नसला तरी चालेल, असे नगरसेवकांचे मत

निधी नसला तरी चालेल, मात्र अर्थसंकल्पात आमच्या प्रभागातील कामांचा समावेश करा. त्यासाठी अर्थसंकल्पात वर्कहेडचा समावेश करा, असा आग्रह नगरसेवकांकडून धरला जात आहे. नगरसेवकांचे मान राखण्यासाठी तरतूद नसली तरी, त्यांच्या कामांचा समावेश करण्यासाठी तयारी स्थायी समितीने केल्याचे दिसत आहे. परिणामी, उपसूचनांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

यशवंतराव चव्हाण स्मारकास पालिकेकडून एक कोटीची देणगी

यशवंतराव चव्हाण स्मारक समितीच्यावतीने प्राधिकरण, निगडी येथे यशवंतराव चव्हाण स्मारक उभारण्यात येत आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. समितीला महापालिकेकडून एक कोटी रुपयाची देगणी देण्यास स्थायी समितीने ऐनवेळी मान्यता दिली आहे.

सभेच्या अध्यक्षस्थानी अभिषेक बारणे हे होते. यशवंतराव चव्हाण स्मारक समितीच्या वतीने प्राधिकरण, निगडी येथील 44 गुंठे जागेत यशवंतराव चव्हाण यांचे भव्य स्मारक उभारण्यात येत आहे. स्मारकात ग्रंथालय, वाचनालय, मुलांसाठी अभ्यासिका, वसतीगृह, वधू-वर सूचक केंद्र, विद्यार्थी मागर्दशन केंद्र, वैद्यकीय उपचार केंद्र, सांस्कृतिक भवन, कार्यालये, गाळे आदी बांधण्यता येत आहे. स्मारकाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

स्मारकासाठी महापालिकेने सन 2028-2021 मध्ये एकूण 5 कोटी रुपयांचे देणगी दिली आहे. सन 2022-23 मध्ये पुन्हा 5 कोटी रुपयांची देगणी देण्यात आली आहे. सन 2024-25 मध्ये पुन्हा 5 कोटी रुपयांची देगणी त्या समितीला दिली आहे. असे एकूण 15 कोटी रुपयांचे अनुदान देगणी स्वरुपात त्या समितीला महापालिकेने आत्तापर्यंत दिले आहे. त्या देगणीतून समितीने संपूर्ण बांधकाम पूर्ण केले आहे. तेथे 140 किलो वॅटचा क्षमतेचा सौर उर्जा पॅनेल बसविणे आणि खर्च्या व फर्निचरासाठी आणखी 1 कोटी रुपयांची देगणी दिली आहे. त्या खर्चास स्थायी समितीने ऐनवेळी मान्यता दिली असून एकूण महापालिकेने 16 कोटी रुपये त्या समितीला देगणी स्वरुपात

दिले आहेत.

आतापर्यंत 80 उपसूचना प्राप्त

आयुक्तांनी सन 2026-27चा अर्थसंकल्प तयार केला आहे. मात्र, शहराच्या विकासासाठी नगरसेवकांनी सुचवलेल्या कामांचाही समावेश होणे गरजेचे आहे. शहराची गरज आणि आवश्यकता लक्षात घेऊन मोठ्या कामांचा अर्थसंकल्पात समावेश करण्याचा प्रयत्न आहे. आत्तापर्यंत नगरसेवकांकडून एकूण 80 उपसूचना प्राप्त झाल्या आहेत, असे स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे यांनी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT