Commissioner meet PCMC: ‘पोलिस आयुक्तांची भेट’ उपक्रमात नागरिकांनी मांडल्या समस्या

वाहतूककोंडी, स्थानिक अडचणींसह विविध तक्रारी; पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात 76 नागरिकांची उपस्थिती
‘पोलिस आयुक्तांची भेट
‘पोलिस आयुक्तांची भेटPudhari
Published on
Updated on

पिंपरी : ‌‘पोलिस आयुक्तांची भेट‌’ या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांनी थेट पोलिस आयुक्तांसमोर आपल्या विविध समस्या आणि तक्रारी मांडल्या. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात आयोजित उपक्रमात नागरिकांनी वाहतूककोंडी, स्थानिक अडचणी तसेच कायदा-सुव्यवस्थेशी संबंधित प्रश्न उपस्थित करत आपल्या व्यथा मांडल्या.

‘पोलिस आयुक्तांची भेट
Pimpri Chinchwad Police Complaint: ‘साहेब कामात आहेत!’; पोलिस ठाण्यांत तक्रारदारांना भेटीचा प्रश्न

पोलिस आयुक्तालयातील शिवनेरी हॉल येथे आयोजित या कार्यक्रमात एकूण 76 नागरिकांनी उपस्थिती दर्शवली. या वेळी नागरिकांनी शहरातील वाहतूककोंडी, पार्किंगची समस्या, स्थानिक पातळीवरील वाद तसेच इतर नागरी अडचणींबाबत सूचना आणि तक्रारी मांडल्या. उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या तक्रारींची नोंद घेऊन संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना दिल्या.

कार्यक्रमाला पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलिस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलिस आयुक्त सारंग आवाड, बसवराज तेली आणि सर्व उपायुक्त उपस्थित होते. यासह व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व सहायक पोलिस आयुक्त आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक सहभागी झाले होते. त्यामुळे विविध पोलिस ठाण्यांशी संबंधित प्रश्नांवर तत्काळ चर्चा होऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्यात आला.

‘पोलिस आयुक्तांची भेट
Chinchwad Student Accident: चिंचवडमध्ये भीषण अपघात; मिक्सर डंपरच्या धडकेत दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

या वेळी दिघी पोलिस ठाण्यातील घरफोडी प्रकरणातील फिर्यादी परमेश्वर गिराम यांनी त्यांच्या चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिन्यांचा शंभर टक्के शोध लावून ते परत मिळवून दिल्याबद्दल पोलिस आयुक्तांचा सत्कार केला. पोलिसांच्या तत्पर तपासाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.तसेच, पिंपरी-चिंचवड शहरातील ऑर्थोपेडिक डॉक्टर असोसिएशनचे पदाधिकारीही कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांनी आपल्या व्यावसायिक कामकाजाशी संबंधित समस्या मांडल्या आणि पोलिसांना सहकार्य करण्याची तयारी दर्शवली.

‘पोलिस आयुक्तांची भेट
Pimpri Property Tax Bill Distribution: पिंपरी-चिंचवडमध्ये मालमत्ताकर बिले वाटप महिला बचत गटांकडे

दर सोमवारी उपक्रम

‌‘पोलिस आयुक्तांची भेट‌’ हा उपक्रम दर सोमवारी आयोजित केला जाणार असून, नागरिकांना कोणतीही पूर्वपरवानगी न घेता निश्चित वेळेत थेट पोलिस आयुक्तांना भेटता येणार आहे. शहरातील नागरिक, औद्योगिक प्रतिनिधी, महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रांतील व्यक्तींनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news