पिंपरी: दोन किंवा जास्त ठिकाणी मतदान यादीत नोंद असलेल्या मतदारांना एकाच ठिकाणी मतदान करता येईल. मतदारांच्या यादीतील नावापुढे दोन स्टार चिन्हांकित केले जाणार आहे. त्या मतदारांकडून आधीच ते कोणत्या ठिकाणी मतदान करणार आहेत, याबाबत लेखी हमीपत्र घेतले जाईल. जरी दोन ठिकाणी नाव असले तरी त्या मतदाराला एकाच ठिकाणी मतदान करता येईल. बोगस (दुबार) मतदान होऊ नये, यासाठी महापालिका प्रशासनाकडून वेगवेगळ्या पातळीवर खबरदारी घेण्यात येत आहे, असे असे महापालिकेच्या निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले आहे. (Latest Pimpri chinchwad News)
शहरात मोठ्या प्रमाणात दुबार मतदार
मतदार यादीमधील घोळ आणि दुबार मतदारांच्या मुद्द्यावरून संपूर्ण राज्यात विरोधकांनी रान उठवले आहे. तसेच, मतदार यादीतील दुरुस्ती होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी महाविकास आघाडीसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. शहरातील पिंपरी, चिंचवड व भोसरी विधानसभा मतदारसंघातही मोठ्या संख्येने दुबार मतदार आहेत, अशी तक्रार राष्ट्रवादी काँग््रेासचे (अजित पवार) माजी शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केली आहे.
हमीपत्र घेतले जाणार
मतदार यादीत दोन किंवा जास्त ठिकाणी नोंद असलेल्या मतदाराच्या यादीतील नावापुढे दोन स्टार चिन्हांकित केले जाणार आहे. या मतदाराकडून आधीच तो कोणत्या ठिकाणी मतदान करणार, हे लिहून घेतले जाईल. दोन ठिकाणी नाव असले तरी तो एकाच ठिकाणी मतदान करेल. ज्याने आधी लिहून दिले नसेल आणि तो मतदार एखाद्या केंद्रात मतदानाला गेल्यास तिथे त्याच्याकडून हमीपत्र लिहून घेतले जाईल. त्यानंतरच त्याला तेथे मतदान करू दिले जाईल, असे निवडणूक विभागाने सांगितले.
एक जुलै 2025 ची मतदार यादी निवडणुकीसाठी ग््रााह्य धरण्यात आली आहे. त्यामुळे आता त्या यादीमध्ये एकही नाव कमी करणे किंवा जोडणे शक्य नाही. तसेच, त्या यादीमध्ये काही नावे दुबार असल्याची शक्यता आहे. अशी दुबार नावे शोधली जात आहेत. महापालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय मतदार यादी तयार करण्यासाठी कर्मचारी काम करीत आहेत. त्यांना दुबार मतदार आढळून आल्यास तसे सांगण्यात आले आहे. त्या नावाची नोंद तशी केली जाणार आहे. दुबार नावे असलेल्या मतदारांना एकपेक्षा जास्त ठिकाणी मतदान करता येऊ नये, यासाठी त्यांच्या नावापुढे दोन स्टार दिले जाणार आहेत. त्यासाठी निवडणूक आयोगाकडून देण्यात येणाऱ्या स्वतंत्र प्रणालीत विशेष नोंद केली जाणार आहे. प्रत्यक्ष मतदान होईपर्यंत दुबार मतदारांची नावे शोधण्याची मोहीम सुरूच राहणार आहे. त्यासाठी स्वतंत्र कर्मचारी नेमण्यात आले आहेत.
प्रारुप मतदार यादीवरl 22 नोव्हेंबरपर्यंत हरकती स्वीकारणार
प्रारूप मतदार यादी मंगळवारी (दि. 14) प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यावर 22 नोव्हेंरपर्यंत हरकती व सूचना मागविण्यात येणार आहे. प्राप्त हरकती व सूचनांवर सुनावणी घेऊ? अंतिम मतदार यादी 6 डिसेंबरला प्रसिद्ध केली जाईल. तसेच, मतदान केंद्रनिहाय मतदार यादी 12 डिसेंबरला प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
मतदार यादीबाबत प्रशासन गांभीर्याने विचार करत आहे. दुबार मतदारांना एकाच ठिकाणी मतदान करता येईल. त्यासाठी नावापुढे चिन्हांकित केले जाईल. तसेच, त्यांच्याकडून कुठे मतदान करणार आहे, हे लेखी घेतले जाईल. मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी गेल्यानंतरदेखील ज्यांच्या नावापुढे स्टार आहे. त्यांच्याबाबत माहिती घेऊनच मतदान करू दिले जाईल.सचिन पवार, उपायुक्त, निवडणूक विभाग, महापालिका