Marathi Language  Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Abhijat Marathi Language Week: पिंपरी-चिंचवडमध्ये ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’; ३ ते ९ ऑक्टोबरदरम्यान विविध उपक्रम

महापालिकेकडून साहित्य, कला आणि संस्कृतीशी संबंधित कार्यक्रमांचे आयोजन; नागरिक, साहित्यिक, कलाकारांना सहभागी होण्याचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: मराठी भाषेचे वैभव अधिक समृद्ध करण्यासाठी महापालिका सर्वांना सोबत घेऊन मराठी भाषा संवर्धनासाठी विविध उपक्रम राबवित आहे. यावर्षीच्या अभिजात मराठी भाषा दिवस तसेच, अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या निमित्तानेही महापालिकेच्या वतीने मराठी भाषेतील साहित्य व संस्कृतीशी संबंधित विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

महापालिकेच्या वतीने 3 ते 9 ऑक्टोबर या कालावधीत अभिजात मराठी भाषा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त महापौर लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन बैठक झाली. त्या वेळी ते बोलत होते.

या सर्व कार्यक्रमांमध्ये मराठी साहित्य, कला आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन मराठी भाषा संवर्धनाच्या या उपक्रमाला सहकार्य करावे, असे आवाहन महापौर रवी लांडगे यांनी मंगळवारी (दि.15) केले.

बैठकीस उपायुक्त पंकज पाटील, आयटीआयचे प्राचार्य शशिकांत पाटील, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, ग्रंथालय प्रमुख प्रतिभा मुनावत, ग्रंथपाल वर्षा जाधव, वैशाली थोरात यांच्यासह मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कार्यरत संस्थांचे प्रतिनिधी, साहित्यिक, अभ्यासक व कलाकार उपस्थित होते.

भाषा सप्ताह आयोजनाबाबत नागरिक, साहित्यिक, लेखक, कवी, अभ्यासक, कलाकार तसेच, विविध सामाजिक संस्थांनी आपल्या सूचना वेळेत लेखी स्वरूपात महापालिका भवनाच्या तळमजल्यावरील माहिती व जनसंपर्क विभागात सादर कराव्यात किंवा pro@pcmcindia.gov.in या ईमेलवर पाठवाव्यात, असे आवाहन करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT