Pimpri Chinchwad Election | पिंपरी-चिंचवडमध्ये तब्बल ५ लाख २२ हजार नवमतदार Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Election 2026: पिंपरी-चिंचवडमध्ये तब्बल ५ लाख २२ हजार नवमतदार; कोणाच्या पारड्यात पडणार हा निर्णायक कौल?

नऊ वर्षांत मतदारसंख्येत विक्रमी वाढ; नवमतदार कोणत्या पक्षाकडे झुकणार, यावरून राजकीय गणिते तापली

पुढारी वृत्तसेवा

मिलिंद कांबळे

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक जानेवारी 2026 ला होत आहे. त्यासाठी 1 जुलै 2025 पर्यंत नोंदणी असलेल्या मतदारांना मतदान करता येणार आहे. फेब्रुवारी 2017 नंतर होणाऱ्या या निवडणुकीसाठी गेल्या 9 वर्षांत तब्बल 5 लाख 21 हजार 802 मतदार वाढले आहेत. नऊ वर्षांत शहरातील राजकीय वातावरणात मोठा बदल झाला आहे. त्या स्थितीत हे नवमतदार कोणाला मतदान करणार, त्याचा फायदा कोणत्या पक्षाला व उमेदवारांना होणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यावरुन अनेक दावे-प्रतिदावे केले जात आहेत.(Latest Pimpri chinchwad News)

शहरात वेगवेगळ्या कारणांनी नागरिक वास्तव्यास येण्याचे प्रमाण मोठे आहे. काम, व्यवसाय, नोकरी, शिक्षण आदींसाठी शहरात राहण्यास पसंती दिली जात आहे. पुणे तसेच, मुंबईला जोडणारे हे शहर असल्याने येथे राहण्यास मोठी पसंती दिली जात आहे. त्यामुळे शहराची लोकसंख्या वेगाने वाढत आहे. शहरात नव्याने वास्तव्यास आलेले नागरिक, 18 वर्षे पूर्ण झालेले युवक व युवती, आयटी कंपन्यांतील अभियंते, महाविद्यालयीन विद्यार्थी, परप्रांतीय कामगार व मजूर, कुटुंबातील सदस्य वाढल्याने ते शहरात इतरत्र स्थायिक होत आहेत, आदी विविध कारणांमुळे मतदार संख्याही वाढत आहे.

या शहराचे गाव पण जाऊन स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. मिनी इंडिया तसेच, कॉस्मोपॅलिटीन सिटी अशी नवी ओळख निर्माण होत आहे. गाववाल्यांनी निर्णय घेतल्यास कोणत्याही पक्षाचा उमेदवार निवडून येतो, असे काहीसे चित्र अद्याप टिकून असल्याचा दावा केला जात आहे. बाहेरून आलेल्या अनेक मंडळींनी शहरात मानाचे स्थान मिळविले आहे. असे विविध निवडणूक निकालावरून स्पष्ट

झाले आहे. नवमतदार हे कोणाच्या बाजूने कौल देणार, याची उत्सुकता लागली आहे. प्रभागातील त्या मतांवर लक्ष ठेवण्यासाठी तसेच, ती मते आपल्याकडे खेचण्यासाठी काही इच्छुकांनी संपर्क मोहीम राबविली आहे.

नऊ वर्षांत प्रभागात अनेक बदल

फेब्रुवारी 2017 नंतर आता निवडणूक होत आहे. त्या तब्बल 9 वर्षांच्या कालावधीत शहरात अनेक बदल झाले आहेत. पालिकेचे तब्बल तीन आयुक्त बदलून गेले आहेत. शहरभरात स्मार्ट सिटीसह अर्बन स्ट्रीट डिजाईनची कामे सुरू आहेत. ज्या भागांत रस्ते नव्हते, तेथे प्रशस्त रस्ते व उड्डाणपूल तयार झाले आहेत. सन 2017 ते 2022 या पंचवार्षिकेत नगरसेवकांचा प्रभागात तसेच, मतदारांशी दांडगा संपर्क होता. मात्र, त्यानंतर निवडणुका न होता, त्या पुढे पुढे ढकलल्या गेल्याने माजी नगरसेवक व मतदारांमधील संपर्क तुटला आहे. तसेच, पराभूत उमेदवारांशिवाय नव्या पिढीतील अनेक इच्छुक निवडणुकीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झाले आहेत. परिणामी, प्रभागात स्पर्धकांची संख्या वाढली आहे. लोकवस्ती वाढल्याने मतदार संख्येत भर पडली आहे. त्यांना माजी नगरसेवकांनी केलेल्या कामांची माहिती नाही.ती वाढलेली मते कोणाच्या झोळीत पडणार, कोणाला त्याचा फटका बसणार, यावरून गणिते मांडली जात आहेत.

मतदार संख्या झपाट्याने वाढण्याची कारणे

शहरातील चारी बाजूस टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. जुन्या इमारती पाडून रिडेव्हल्पमेंटमध्ये उंच इमारती उभ्या राहत आहेत. मोकळ्या तसेच, शेतीच्या जागा कमी होऊन सिमेंटचे जंगल निर्माण झाले आहे. पिंपरी-चिंचवड राहण्यायोग्य शहर म्हणून ओखळले जाते. झपाट्याने वाढत असलेल्या देशातील शहरापैकी पिंपरी-चिंचवड हे एक शहर आहे. दाट लोकवस्तीमुळे लोकसंख्या वेगात वाढत आहे. सध्या 30 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असल्याचा अंदाज आहे. परिणामी, मतदार संख्याही झपाट्याने वाढत आहे.

शहरातील मतदार संख्या वाढीचा वेगही अधिक

फेबु्रवारी 2017 ला मतदार संख्या- 11 लाख 92 हजार 89

एक जुलैपर्यंत मतदार संख्या- 17 लाख 13 हजार 891

नऊ वर्षात वाढलेली मतदार संख्या- 5 लाख 21 हजार 802

बनावट कागदपत्रांच्या आधारे फसवणूक

पिंपरी : महाराष्ट्रात राहणाऱ्या व्यावसायिकाच्या नावाने वाहनाचे आरसी बुक, विमा प्रमाणपत्र तयार करून त्याआधारे परराज्यात बँक खाते सुरू केले. त्या खात्यावर अनेकांकडून पैसे घेतले. तसेच तिथल्या शासकीय यंत्रणेला खोटी माहिती देऊन महाराष्ट्रातील दाम्पत्याच्या लौकिकास बाधा निर्माण करून फसवणूक केली. हा प्रकार 2023 ते ऑक्टोबर 2025 या कालावधीत ऑनलाईन माध्यमातून घडला.

संतोष सेवू पवार (38, रा. बावधन, मुळशी) यांनी बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनिष आचार्य, मुकुल जैन, पराग गर्ग, मनीष अग््रावाल, सोनी कुमार, भूमीत वर्मा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी संतोष पवार यांनी त्यांचे, त्यांची पत्नी आणि मेहुणा यांचे बँक खात्याचे तपशील किर्गिस्तान देसाहत वैद्यकीय महाविद्यालयात गुंतवणूक करण्यासाठी आरोपी अनिष आचार्य, मुकुल जैन, पराग गर्ग आणि मनीष अग्रवाल या चौघांना दिले होते. ते खात्याचे तपशील मनीष अग्रवाल याने सोनू कुमार आणि भूमीत वर्मा यांना दिले. सोनू कुमार आणि भूमीत वर्मा यांना मनीष याने तो संतोष पवार असल्याचे भासवून त्या दोघांकडून पैसे घेतले. दरम्यान, त्याने संतोष पवार यांच्या नावाचे वाहनाचे आरसी बुक, विमा प्रमाणपत्र बनावट तयार केले. त्यानंतर त्या दोघांना सायबर गुन्हे दाखल करण्यास सांगून शासकीय यंत्रणेस खोटी माहिती देत पवार यांच्या लौकिकास बाधा निर्माण करत फसवणूक केली. बावधन पोलिस तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT