LPG Gas Pudhari
पिंपरी चिंचवड

Chakan Gas Theft: चाकणमध्ये गॅस चोरीचा पर्दाफाश; टँकरमधून बेकायदेशीर गॅस भरताना तिघे जेरबंद

इंडियन ऑईल प्लांटजवळ कारवाई; 49 लाखांचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: चाकण-शिक्रापूर रोडवरील भोसे गावच्या हद्दीत इंडियन ऑईल गॅस प्लांटच्या परिसरात गॅस टँकरमधून घरगुती गॅस टाकीत बेकायदेशीरपणे गॅस भरला जात होता. दरम्यान, पोलिसांनी कारवाई करत तिघांना अटक केली आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 31) पहाटे करण्यात आली.

अंबादास रोहिदास गाडे (42, रा. चेंबूर, मुंबई, मूळ- परळी वैजनाथ, बीड), अक्षय रमेश मुंगसे (25, रा. रासे, खेड) आणि नवनाथ अंकुश होजगे (34, रा. भोसे, खेड) या तिघांना अटक केली आहे. याप्रकरणी पोलिस शिपाई भैरोबा यादव यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी गॅस टँकरचे सील तोडून टँकरला काळ्या रंगाचे नोजल पाईप लावले. कोणत्याही सुरक्षा उपकरणांशिवाय स्वतःच्या आणि इतरांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने ते घरगुती गॅस टाकीत गॅस चोरून भरला. आर्थिक फायद्यासाठी हा गॅस चोरून चढ्या दराने विकण्याचा त्यांचा उद्देश होता. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात 49 लाख 57 हजार 600 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. उत्तर चाकण पोलिस तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT