पिंपरी: या प्रभागात माजी उपमहापौर तुषार हिंगे यांचे भाजपचे येथे पॅनेल आहे. त्यांना राष्ट्रवादी काँग््रेासच्या माजी महापौर मंगला कदम या एकमेव विरोधी पक्षातील माजी नगरसेविका होत्या. त्यांचे पुत्र कुसाग््रा कदम यांनी भाजपत प्रवेश केल्याने भाजपची वाटचाल सुलभ झाल्याचा दावा केला जात आहे.
विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांच्या मातोश्री माजी नगरसेविका अनुराधा गोरखे, ओबीसी जागा महिला राखीव झाल्याने माजी उपमहापौर केशव घोळवे यांच्या जागी त्यांच्या पत्नी अनुराधा घोळवे तसेच, महेश चांदगुडे, सुप्रिया महेश चांदगुडे, माजी उपमहापौर तुषार हिंगे व इतर इच्छुक आहेत. राष्ट्रवादी काँग््रेासचे माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे, जगदीश शेट्टी, डॉ. नीलिमा गायकवाड, कविता खराडे हे इच्छुक आहेत. शिवसेनेकडून दत्तात्रय भालेराव, तसेच, माजी महापौर आझम पानसरे यांचे सुपुत्र निहाल पानसरे, संदीप चव्हाण, संदीप सरकार, विलास उर्से, अमित देशमुख, अनिकेत शेलार, श्रीकांत इंगळे, सर्जेराव गायवकवाड, अमित बाबर, मानसी वाघेरे, रेणुका भोजने, बम्हानंद जाधव, गौतम तायडे, संदीप चव्हाण, अजित भालेराव, नितीन चव्हाण, दीपाली करंजकर, रमा भोसले आदी इच्छुक आहेत.
माजी महापौर मंगला कदम यांचे सुपुत्र कुशाग्र कदम भाजपत आल्याने भाजपचे पॅनेल अधिक बळकट झाले आहे. तर, राष्ट्रवादी सक्षम उमेदवार रिंगणात उतरविण्याच्या तयारी आहे. त्यामुळे दोन्ही पक्षातील संघर्ष मतदारांसाठी लक्षवेधी ठरणार आहे.
प्रभागातील परिसर
संत ज्ञानेश्वरनगर (म्हाडा), मोरवाडी, लालटोपीनगर, अमृतेश्वर कॉलनी, पिंपरी कोर्ट, इंदिरानगर, परशुरामनगर, शंकरनगर, अण्णासाहेब नगर, सरस्वती विश्व विद्यालय परिसर, आंबेडकर कॉलनी, एचडीएफसी कॉलनी, दत्तनगर.
राजश्री शाहू पुतळ्याचे सुशोभिकरण
राजश्री शाहू महाराज उद्याव व शाहू सृष्टीचे काम सुरू आहे. राजश्री शाहू महाराज पुतळ्याचे आकर्षक सुशोभिकरण करण्यात आले आहे. मुख्य रस्ते अर्बन स्ट्रीट डिजाईननुसार सुशोभित करण्यात येत आहेत. चौकांचे सुशोभिकरण करण्यात आले आहे. सुरक्षेसाठी जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे उभारण्यात आले आहेत. बर्ड व्हॅली उद्यानाचे सुशोभिकरण करून रेंजर शो सुरू करण्यात आला आहे. लालटोपीनगर येथे कामगार कल्याण भवन उभारण्याचे काम सुरू झाले आहे. प्रभागातील झोपडपट्ट्यात एसआरए योजना राबवून झोपडीधारकांना पक्की घरी मिळवून देण्यात येत आहेत. नव्याने जलवाहिनी व ड्रेनेजलाईन टाकण्यात आली आहेत.
प्रभागातील जागांचे आरक्षण
अ-एससी महिला
ब-ओबीसी महिला
क-सर्वसाधारण
ड-सर्वसाधारण
बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयास टाळे
संभाजीनगर येथे निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयाच्या नूतनीकरणाचे काम कासव गतीने सुरू आहे. काम पूर्ण न झाल्याने प्राणि संग्रहालयाला गेल्या आठ वर्षांपासून टाळे आहे. परिणामी, नागरिकांना पुण्यातील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयास भेट द्यावी लागत आहे. बर्ड व्हॅली उद्यानात मुलाबाळांसह आलेल्या नागरिकांना प्रेमीयुगुलाच्या चाळ्याचा त्रास होतो. शाहूनगर व संभाजीनगर या जी ब्लॉकमध्ये असलेल्या एमआयडीसीच्या इमारती 30 ते 35 जुन्या असल्याने त्या धोकादायक झाल्या आहे. त्या इमारतींचा पुनर्निर्माण करण्याची मागणी प्रलंबित आहे. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने रहिवाशी त्रस्त आहेत. झोपडपट्टी भागात स्वच्छता प्रश्न कायम आहे. गुन्हेगारीमुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही भागांतील सीसीटीव्ही बंद पडले आहेत. सखल भागात कमी दाबाने पाणी येते. महापालिकेच्या आरक्षित जागेत अतिक्रमण झाले आहे. रस्ते अरुंद असल्याने वाहतूक कोंडीची समस्या कायम आहे. अनियमितपणे व कमी दाबाने पाणीपुरवठा होतो.