Pimpri Ward Politics: पिंपरीत राष्ट्रवादी पॅनेल डगमगले; भाजपकडून ताब्यासाठी व्यूहरचना

समीर मासुळकरांच्या भाजप प्रवेशाने प्रभागातील राजकीय समीकरणे बदलली
Pimpri Ward Politics
Pimpri Ward PoliticsPudhari
Published on
Updated on

पिंपरी: अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग््रेासच्या पॅनेलला सुरुंग लागला आहे. समीर मासुळकर भाजपत गेल्याने प्रभागातील राजकीय चित्र बदलले आहे. राष्ट्रवादीच्या ताब्यातील पॅनेलवर कब्जा करण्याचा भाजपचे प्रयत्न सुरू आहे. मात्र, राष्ट्रवादी आपली ताकद दाखविण्यासाठी सरसावला आहे.

Pimpri Ward Politics
Pimpri Chinchwad NCP Politics: भाजपच्या फोडाफोडीनंतरही राष्ट्रवादी मजबूत; पिंपरी-चिंचवड महापालिकेवर दावा

प्रभागात माजी नगरसेवक राहुल भोसले यांचे पॅनेल आहे. त्याच्यासोबत माजी महापौर डॉ. वैशाली घोडेकर, गीता मंचरकर, समीर मासुळकर हे होते. तेथून विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे सुपुत्र सिद्धार्थ बनसोडे इच्छुक आहेत. गेल्या वेळेस भाजपचा दारुण पराभव झाला होता. यंदा मासुळकर यांनी भाजपत प्रवेश केला आहे. तसेच, त्यांच्या पत्नी इच्छुक आहेत. भाजपकडून राजेश पिल्ले, ॲड. वीना सोनवलकर, आशा काळे, मंदाकिनी ठाकरे, अर्जून ठाकरे, काँग््रेासमधून भाजपत गेलेले माजी नगरसेवक सद्गुरू कदम, निर्मला कदम, संजय मंगोडेकर, शिवसेनेकडून दत्तात्रय भालेराव, गणेश जाधव, काँग््रेासकडून नरेंद्र बनसोडे, चंद्रकांत लोंढे, राष्ट्रवादी काँग््रेास शरदचंद्र पवार पक्षाकडून इमान शेख, आस्मा शेख, सचिन शिंदे, धम्मराज साळवे आणि आरपीआयकडून अजिज शेख हे इच्छुक आहेत.

Pimpri Ward Politics
Charholi Bridge Traffic Issue: चऱ्होलीतील दाभाडे सरदार पूल दुरुस्तीसाठी बंद; आळंदी–देहू फाट्यावर वाहतूक कोंडीचा इशारा

तसेच, चंद्रकांत बुचकुरे, उमेश वाळके, डॉ. मनीषा गरुड, दत्ता झुळूक, खालिद मुजावर, फारुख इनामदार, संजू झोपे, उमेश खंदारे, अशोक बनसोडे, मुमताज शेख, मोहन पवार, पंकज वाघमारे, विशाल मासुळकर, महेश मासुळकर, समरीन कुरेशी, उमेश बनसोडे, किरण पवार, अविनाश चौधरी, हमीद शेख, वैशाली खाडे, नीलेश जाधव, सचिन शेटे, सचिन गायकवाड हे इच्छुक आहेत. राष्ट्रवादी पॅनेल डगमल्याने त्यांच्या पॅनेलवर ताबा मिळविण्यासाठी भाजपकडून व्यूहरचना आखण्यात आली आहे. तर, राष्ट्रवादी आपली जागा राखण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे.

Pimpri Ward Politics
Lonavala Nagar Parishad Election Result: लोणावळा नगरपरिषदेत राष्ट्रवादीची निर्विवाद सत्ता

प्रभागातील परिसर

टाटा मोटर्स, यशवंतनगर, विठ्ठलनगर, नेहरूनगर, उदयमनगर, स्वप्ननगरी, पंतप्रधान आवास योजना गृहप्रकल्प, अंतरीक्ष सोसायटी, अजमेरा सोसायटी, महिंद्रा रॉयल, खराळवाडी, गांधीनगर, महिंद्रा ॲन्थिया सोसायटी आदी.

अजमेरा कॉलनीत अद्ययावत नेत्र रुग्णालय

पाणीसमस्या सोडविण्यासाठी अण्णासाहेब मगर वसाहत व महिंद्रा सोसायटीजवळ टाकी उभारण्यात आली आहे. नेहरुनगरातील जुन्या स्मशानभूमीचे नूतनीकरण तसेच, विद्युत दाहिणी उभारण्यात आली आहे. अजमेरा कॉलनीत अद्ययावत नेत्र रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. प्रभागातील मुख्य रस्त्यावर अर्बन स्ट्रीट डिजाईननुसार पदपथ व सायकल ट्रॅक विकसित करून चौकांचे सुशोभिकरण करण्यात आले आहे. अजमेरा कॉलनीत छबुताई मासुळकर उद्यान सुरू केले आहे. झोपडीधारकांना हक्काचे पक्के घरे मिळावे, यासाठी यशवंतनगर, डॉ. आंबेडकरनगर, विठ्ठलनगर, भारत मातानगर, खराळवाडी, साईनाथनगर, राजीव गांधीनगर येथे एसआरए योजना राबविण्यात येत आहे. उदयमनगर येथे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत यशस्वीपणे गृहप्रकल्प राबविण्यात शेकडो कुटुंबाना सदनिका देण्यात आल्या आहेत.

Pimpri Ward Politics
Wadgaon Maval Nagar Panchayat Election Result: वडगाव नगरपंचायतीत राष्ट्रवादीची सत्ता, पर्चेस व्होटिंगचा फंडा काही ठिकाणी फसला

प्रभागातील जागांचे आरक्षण

  • अ-एससी

  • ब-ओबीसी महिल

  • क-सर्वसाधारण महिला

  • ड-सर्वसाधारण

अण्णासाहेब मगर स्टेडिमयचे पुनर्निर्माण रखडले

झोपडपट्टी, मध्यवर्गीय तसेच, हाऊसिंग सोसायटी असा संमिश्र लोकवस्तीतील मतदार या प्रभागात आहे. हा दाट लोकवस्तीचा प्रभाग आहे. अनधिकृत बांधकामांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरी सुविधांना प्रश्न जटील झाला आहे. प्रभागातील मुख्य व अंतर्गत रस्ते अरुंद आहेत. रस्ते व पदपथावर विक्रेते, दुकानदार तसेच, वाहनांचे बेशिस्त पार्किंग होत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या कायम आहे. हेगडेवार मैदानाची दुरवस्था झाली आहे. एचए मैदानावर राडारोडा आणून टाकला जात असल्याने परिसर विद्रुप झाला आहे. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अण्णासाहेब मगर स्टेडिमयचा पुनर्निर्माण न झाल्याने खेळाडू व ज्येष्ठ नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. शहरातील सर्वांत मोठा जलतरण तलाव दुरुस्तीच्या नावाखाली वारंवार बंद असतो. गुन्हेगारी वाढल्याने महिला व बालिका सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news