पिंपरी: भाजप विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी काँग््रेास अशी सरळ लढत या प्रभागात पाहावयास मिळणार आहे. भाजपने नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. राष्ट्रवादीने नव्या व जुन्याचा मेळ घालत रिंगणात पॅनेल उतविण्यात आले आहे. मतदार कोणाला पसंती देणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे. गेल्या निवडणुकीत भाजपकडून माधवी राजेंद्र राजापुरे, सीमा दत्तात्रय चौगुले, अंबरनाथ कांबळे आणि अपक्ष नवनाथ जगताप हे विजयी झाले होते. प्रभागात भाजपचे तीन व अपक्ष एक असे नगरसेवक बलाबल होते. नवनाथ जगताप यांनी भाजपत प्रवेश केला आहे. त्यांना तसेच, ज्ञानेश्वर उर्फ माऊली जगताप, कल्पना महेश जगताप आणि दुर्गा आदियाल यांना उमेदवारी देत रिंगणात उतविण्यात आले आहे.
नवनाथ जगताप सोडून तीनही उमेदवार हे नवखे आहेत. माजी नगरसेविका माधवी राजापुरे व सीमा चौगुले यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. तर, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग््रेासकडून माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, अरुण पवार, उमा शिवाजी पाडुळे, माजी नगरसेवक अंबरनाथ कांबळे यांची मुलगी दिप्ती कांबळे असे पॅनेल आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग््रेास असा थेट सामना रंगणार आहे. भाजप प्रभागात वर्चस्व मिळविण्याच्या तयारीत आहे. तर, राष्ट्रवादी काँग््रेासने रणनिती आखत प्रभागात लक्ष केंद्रीत केले आहे. प्रभाग ताब्यात घेण्याचे नियोजन केले आहे. मतदार कोणाला पसंती देणार यांची उत्सुकता निर्माण झाली आहे.
प्रभागातील परिसर
नवी सांगवी, राजीव गांधीनगर, गजानन महाराजनगर, कीर्तीनगर, विनायकनगर, गणेशनगर, कवडेनगर, गांगार्डनगर भाग, विद्यानगर, उरो रुग्णालय आदी.
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले
स्मार्ट सिटीअंतर्गत प्रभागात काँक्रीटचे अद्ययावत रस्ते तयार करण्यात आले आहे. त्यात जुने ड्रेनेजलाईन काढून नव्याने लाईन टाकण्यात आली आहे. तसेच, जलवाहिनी नव्याने टाकण्यात आली आहे. अर्बन स्ट्रीट डिजाईननुसार पदपथ व सायकल ट्रॅक तयार करण्यात आले आहेत. चौकांचे सुशोभिकरण करण्यात आले आहे. साई चौकात भाजी मंडई सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे वाहतूककोंडीतून नागरिकांची सुटका झाली आहे. वीज खंडित होऊ नये यासाठी डीपी फिडर बॉक्स उभारण्यात आले आहेत. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. काळूराम जगताप जलतरण तलावाची दुरूस्ती करुन नूतनीकरण करण्यात आले आहे.
प्रभागातील जागांचे आरक्षण
अ-एसटी महिला
ब-ओबीसी
क-सर्वसाधारण महिला
ड-सर्वसाधारण
पार्किंग झोन नसल्याने वाहने रस्त्यावर
हाऊसिंग सोसायट्या, बैठी घरे, अनधिकृत बांधकामे तसेच, राजीव गांधीनगर झोपडपट्टी असा संमिश्र दाट लोकवस्तीचा हा प्रभाग आहे. कामगार, सर्वसामान्य, मध्यमवर्गीय व उच्चभ्रू असा सर्व वर्गातील मतदार प्रभागात आहेत. लोकवस्ती वाढत असल्याने रस्ते अपुरे पडत आहेत. पार्किंग झोन नसल्याने वाहने रस्त्यांच्याकडेला लावली जात असल्याने वाहतूककोंडी होते. उघड्यावर कचरा टाकला जात असल्याने कचऱ्याचे ढीग जागोगागी दृष्टीस पडतात. उद्यानाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. प्रभागात ठिकठिकाणी ओपन जीम बसविण्यात आले असून, त्याचा लाभ नागरिक घेत आहेत. नटसमाट निळू फुले नाट्यगृहास नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. पावसाचे पाणी रस्त्यावर साचत असल्याने नागरिकांची गैरसोय होते. वाहने फोडणे, गुन्हेगारी असे प्रकार वाढले आहेत.