Pimpri Ward Politics: पिंपरीतील राष्ट्रवादीचा बालेकिल्ला; भाजपचे आव्हान, मतदारांचा कौल कोणाला?

राष्ट्रवादी विरुद्ध भाजप थेट लढत; प्रभागातील वर्चस्वासाठी जोरदार मोर्चेबांधणी
Pimpri 30 Ward Politics
Pimpri 30 Ward PoliticsPudhari
Published on
Updated on

पिंपरी: या प्रभागात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग््रेासचे वर्चस्व आहे. राष्ट्रवादीच्या ताब्यातील प्रभागावर कब्जा करण्यासाठी भाजपने मोर्चेबांधणी केली आहे. मतदार कोणाच्या बाजूने कौल देणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग््रेासचे रोहित काटे, राजू बनसोडे, स्वाती काटे व भाजपच्या आशा शेंडगे या निवडून आल्या होत्या. राष्ट्रवादी 3 व भाजप 1 असे नगरसेवक बलाबल होते. माजी नगरसेवक संजय नाना काटे यांनी भाजपत प्रवेश केला आहे. भाजपने फोडाफोडी करत पॅनेल मजबूत करण्यात प्रयत्न केला आहे. आशा शेंडगे यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. भाजपकडून माजी नगरसेवक संजय नाना काटे, माजी नगरसेविका उषा मुंढे, आरपीआय पक्षाच्या माजी नगरसेविका चंद्रकांत सोनकांबळे, प्रतिभा जवळकर या चार उमेदवारांचे पॅनेल मैदानात उतविण्यात आले आहे.

Pimpri 30 Ward Politics
Pimpri Ward Politics: पिंपरी प्रभागात भाजपाची ऐनवेळी फोडाफोडी; राष्ट्रवादी बॅकफूटवर

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग््रेासकडून माजी नगरसेवक रोहित काटे, राजू बनसोडे, स्वाती काटे, प्रतिक्षा लांघी-जवळकर हे उमेदवार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून तुषार नवले, गोपाळ मोरे, पार्वती अनंत खामकर, सुषमा गोविंद गावडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मनसेकडून रेखा सुधीर जम हे उमेदवार आहे. आम आदमी पक्षाकडून रवींद्र कांबळे, मैथिली राजू कदम, अकिल शेख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग््रेासच्या ताब्यातून प्रभागावर कब्जा मिळविण्यासाठी भाजपने मोठी मोर्चबांधणी केली आहे. तर, राष्ट्रवादी काँग््रेास प्रभाग आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी प्रयत्नाची झुंज करत आहेत. तर, इतर पक्ष विजयासाठी तयारी करीत आहेत. मतदार कोणाच्या बाजूने झुकणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

Pimpri 30 Ward Politics
Pimpri Chinchwad Municipal Election: पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक; शिवसेना (उद्धव)–मनसे–रासप युतीची 88 उमेदवारांची घोषणा

प्रभागातील परिसर

शंकरवाडी भाग, सरीता संगम सोसायटी, शास्त्रीनगर, केशवनगर, कासारवाडीचा भाग, कुंदननगरचा भाग, फुगेवाडी, संजयनगर, दापोडी, सिद्धार्थनगर, गणेशनगर, सुंदरबाग कॉलनी, एसटी वर्कशॉप आदी

फुगेवाडी-दापोडी उड्डाणपुलामुळे वाहतूक सुरळीत

फुगेवाडी व दापोडी जोडणारा रेल्वे मार्गावरील उड्डाणपूल उभारल्याने वाहतूक सुरळीत झाली आहे. प्रभागातील रस्ते काँक्रीटचे करण्यात आले आहेत. अर्बस स्ट्रीट डिजाईननुसार पदपथ व सायकल ट्रॅक विकसित करण्यात येत आहे. प्रभागातील छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शहीद भगतसिंग, तानाजी मालुसरे यांच्या पुतळ्याचे सुशोभिकरण करण्यात आले आहे. जुने ड्रेनेजलाईन बदलून नव्याने टाकण्यात आल्या आहेत. तसेच, जुन्या जलवाहिन्या बदलून नव्याने टाकण्यात येत आहेत.

Pimpri 30 Ward Politics
Lonavala New Year Tourist Rush: लोणावळ्यात नववर्षासाठी पर्यटकांची गर्दी; हुल्लडबाजीवर कडक कारवाईचा इशारा

निगडी ते दापोडी मुख्य जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. नदी प्रदूषण कमी करण्यासाठी नदी काठाने ड्रेनेजलाईन टाकण्यात आली आहे. नदी प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. सुरक्षेसाठी चौक व वर्दळीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे उभारण्यात आले आहेत. दापोडी व कासारवाडीतील उद्यानाचे नूतनीकरण करण्यात आले आहे.

प्रभागातील जागांचे आरक्षण

  • अ-एसटी

  • ब-एसटी महिला

  • क-ओबीसी महिला

  • ड-सर्वसाधारण

Pimpri 30 Ward Politics
PCMC Election AB Form Confusion: पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक; एबी फॉर्मवरून गोंधळ, शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवार प्रतीक्षेत

नागरिक पाणीटंचाईने त्रस्त

पवना नदीवर वसलेला दापोडी हा भाग आहे. पूर्वी दापोडी व फुगेवाडी हा भाग पुणे महापालिका हद्दीत होते. सर्वांधिक झोपडपट्टी, हाऊसिंग सोसायट्या, बैठा चाळ व संरक्षण विभागाचा सीएमई असा संमिश्र हा भाग आहे. सर्वसामान्य, कामगार, मागासवर्र्गीय आणि मध्यवर्गीय या वर्गातील मतदार आहेत. शेवटचे टोक असल्याने या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होता. त्यामुळे नागरिक पाणीटंचाईने त्रस्त आहेत. पवना नदीचे प्रदूषण वाढले आहे. नदी काठावरील दापोडी, फुगेवाडी व कासारवाडी भागांना डास तसेच, दुर्गंधीचा सामना करावा लागतो. पावसाळ्यात नदीला पूर आल्यानंतर लोकवस्ती पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान होते. अनेक भागांत ड्रेनेजलाईन तुंबण्याचे प्रकार घडत आहे. शहराच्या तुलनेत या प्रभागात कमी विकास झाल्याचा आरोप केला जात आहे. दुकानदार, विक्रेते व फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे रस्ते अरुंद होऊन वाहतूककोंडीत भर पडते. हॉकर्स झोन नसल्याने पदपथ व रस्त्यांवर विक्रेते ठाण मांडतात. गुन्हेगारी वाढल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news