Pimpri 29 Ward Politics Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Ward Politics: पिंपरी प्रभागात भाजपाची ऐनवेळी फोडाफोडी; राष्ट्रवादी बॅकफूटवर

शंकुतला धराडे व शाम जगताप यांना भाजपची उमेदवारी; प्रभागातील राजकीय समीकरणे बदलली

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: भाजपने ऐनवेळी फोडाफोडी करत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग््रेासच्या माजी महापौर शंकुतला धराडे व शाम जगताप यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे प्रभागातील संपूर्ण राजकीय समीकरण बदलले आहे. त्यातून भाजपाने पुन्हा संपूर्ण पॅनेल निवडून आणण्याचा प्रयत्न चालविले आहेत. ऐनवेळेस शिलेदार सोडून गेल्याने राष्ट्रवादी काँग््रेास बॅक फूटला गेल्याचे बोलले जात आहे. मात्र, राष्ट्रवादीने नव्या दमाने व्यूहरचना आखली आहे. आमदार शंकर जगताप यांच्या निवासस्थान या प्रभागात आहे. त्यांचे हे होमपीच समजले जाते. या प्रभागात गेल्या निवडणुकीत शशिकांत कदम, सागर आंघोळकर, राजू लोखंडे, उषा मुंढे असे पॅनेल विजयी झाले होते. राजू लोखंडे यांनी राष्ट्रवादी काँग््रेासमध्ये प्रवेश केला आहे.

भाजपने उषा मुंढे यांच्याऐवजी राष्ट्रवादीच्या शंकुतला धराडे यांनी उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादीचे शाम जगताप यांना भाजपने ऐनवेळी उमेदवारी दिली आहे. तर, एससी जागा महिला राखीव झाल्याने माजी नगरसेवक सागर आंघोळकर यांच्याऐवजी रवीना आंघोळकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भाजपचे पॅनेल सक्षम झाल्याचा दावा केला जात आहे. भाजपकडून पुन्हा संपूर्ण पॅनेल ताब्यात घेण्यासाठी कंबर कसली आहे. तर, राष्ट्रवादी काँग््रेासकडून माजी नगरसेवक राजू लोखंडे, तानाजी जवळकर, सुनीता कोळप, कुंदा डोळस या चार उमेदवारांचे पॅनेल आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अनुसया विकास सकट या उमेदवार आहेत. भाजप विरोधात राष्ट्रवादी काँग््रेाससह इतर पक्षांची लढत लक्षवेधी ठरणार आहे.

प्रभागातील परिसर

पिंपळे गुरव, कल्पतरु इस्टेट, क्रांतीनगर, काशिद पार्क, गगनगिरी पार्क, जवळकरनगर, शिवनेरी कॉलनी, गुलमोहर कॉलनी, ओंकार कॉलनी, गोकुळनगरी, भालेकरनगर, सुदर्शननगर आदी.

8 टू 80 पार्कला केंद्राचा पुरस्कार

स्मार्ट सिटीअंतर्गत प्रभागातील रस्ते काँक्रीटचे करण्यात आले आहेत. जुने ड्रेनेजलाईन व जलवाहिनी बदलण्यात आल्या आहेत. 8 टू 80 पार्क उभारण्यात आले आले आहे. त्याला केंद्र सरकारचा पुरस्कार मिळाला आहे. राजमाता जिजाऊ उद्यानमध्ये (डॉयनोसर पार्क) वेस्ट टू वंडर उपक्रमात डॉयनोसरच्या वेगवेगळ्या आकर्षक अशा प्रतिकृती उभारण्यात आल्या आहेत. तसेच, उद्यानाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. सुदर्शन चौकात ग््रेाडसेपरेटर बनविण्यात आल्याने चौक सिग्नल फ्री झाला आहे.

पिंपळे गुरव बस स्थानकाचे सुशोभिकरण करण्यात आले आहे. तेथे स्मार्ट टॉयलेटची सुविधा देण्यात आली आहे. महापालिका शाळेच्या इमारतीचा विस्तार करण्यात आला असून, सुशोभिकरण करण्यात आले आहे. वीज खंडित होऊ नये यासाठी डीपी बॉक्स बसविण्यात आले आहेत. सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. चौकात सुशोभिकरण करण्यात आले आहे. जलप्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत.

प्रभागातील जागांचे आरक्षण

  • अ-एससी महिला

  • ब-एसटी महिला,

  • क-ओबीसी,

  • ड-सर्वसाधारण

वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त

स्मार्ट सिटीत अनेक कामे करण्यात आली आहेत. काँक्रीट रस्ते बनविण्यात आले असून, त्यावर दोन्ही बाजूने वाहने पार्क केली जात असल्याने, दुकानदार, विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्याने वाहतूककोंडीचा त्रास गंभीर झाला आहे. पार्किंग झोन नसल्याने बेशिस्तपणे वाहने लावली जातात. उघड्यावर कचरा टाकला जात असल्याने कचऱ्याचे ढीग दृष्टीस पडतात. उन्हाळ्यात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने हाऊसिंग सोसायट्यांना टॅंकरने पाणी घ्यावे लागते. काही भागात दूषित पाणी असल्याने पाण्याचे जार विकत घ्यावे लागतात. नदीकाठी व मोकळ्या जागा या मद्यपींच्या अड्डे झाले आहेत. वाहन फोडण्याचे प्रकार घडत आहेत. हॉकर्स झोन नसल्याने भाजी विक्रेते रस्त्यावर ठाण मांडतात. रस्त्यावर दुभाजक नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अनधिकृत बांधकामांचे प्रमाण मोठे असल्याने नागरी सुविधांवर ताण वाढत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT