पिंपरी चिंचवड

Pimple Gas Agency: पिंपळे गॅस एजन्सीवर नागरिकांचा संताप; कनेक्शन ट्रान्सफरसाठी 3 हजारांची मागणी

गॅस टंचाईत ग्राहकांची लूट असल्याचा आरोप; कर्मचाऱ्यांच्या उद्धट वर्तणुकीवर चौकशीची मागणी

पुढारी वृत्तसेवा

पिंपळे गुरव : कासारवाडी येथील पिंपळे गॅस एजन्सीच्या भोंगळ कारभाराचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. एजन्सीकडून ग््रााहकांची सर्रास लूट सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. गॅस टंचाईच्या काळात ग््रााहकांना दिलासा देण्याऐवजी कर्मचाऱ्यांच्या उद्धट वर्तणुकीमुळे आणि नियमबाह्य वसुलीमुळे नागरिकांमध्ये तीव संतापाचे वातावरण आहे.

गॅस सिलिंडर कनेक्शन ट्रान्सफर करण्यासाठी शासनाने निश्चित केलेली प्रक्रिया धाब्यावर बसवून, एका ग््रााहकाकडून तब्बल 3 हजार रुपयांची बेकायदेशीर मागणी करण्यात आली आहे. अशा प्रकारची लूट उघडपणे होत असल्याने एजन्सीवर कोणाचे नियंत्रण आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. घरगुती गॅससारख्या स्फोटक आणि संवेदनशील वस्तूची डिलिव्हरी करताना कर्मचारी अत्यंत बेजबाबदारपणे वागत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. यामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

एजन्सीमधील अधिकृत कर्मचाऱ्यांऐवजी केवळ महेल्परफ म्हणून काम करणारे व्यक्तीच ग््रााहकांच्या तक्रारींवर निर्णय घेत आहेत. तक्रार घेऊन येणाऱ्या नागरिकांशी हे लोक अत्यंत उद्धट भाषेत बोलत असून, ग््रााहकांच्या समस्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.

गॅस बुकिंगसाठी नोटीस बोर्डावर दिलेले अधिकृत क्रमांक गेल्या काही दिवसांपासून बंद आहेत. विशेष म्हणजे हे क्रमांक बंद आहेत याची साधी कल्पनाही एजन्सीमधील कर्मचाऱ्यांना नाही. ग््रााहक वारंवार फोन करत असूनही ऑफिसमधील कोणीही फोन उचलण्यास तयार नाही.

नागरिकांची होरपळ

सध्या गॅस सिलिंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे अनेक कुटुंबांना आधीच अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशातच गॅस बुकिंग होत नसल्याने आणि कर्मचाऱ्यांकडून सहकार्य मिळत नसल्याने नागरिकांना एजन्सीच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. ऑनलाइन ॲपवरून बुकिंग करण्याचा सल्ला देऊन कर्मचारी आपली जबाबदारी झटकत असल्याचे चित्र दिसत आहे. या सर्व प्रकाराची अन्न व नागरीपुरवठा विभागाने तात्काळ दखल घेऊन चौकशी करावी. नियमबाह्य पैशांची मागणी करणाऱ्या आणि ग््रााहकांना वेठीस धरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करून गॅस वितरण व्यवस्था सुरळीत करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

जानेवारी महिन्यात गॅस सिलिंडर डिलिव्हरीचा मेसेज प्राप्त झाला; परंतु सिलिंडर मिळाला नाही. याबाबत डिलिव्हरी बॉयकडे विचारणा केली असता आज देतो उद्या देतो असे सांगून टाळाटाळ केली. शेवटी मला गॅसची टाकी दिली नाही. त्यानंतर त्यांनी मला ऑफिसमध्ये जाऊन विचारणा करण्यास सांगितले. ऑफिसमध्ये गेल्यावर कर्मचाऱ्यांनी मला पुन्हा बुकिंग करण्यास सांगितले. बुकिंगचा नंबर बंद असल्यामुळे इतर ॲपद्वारे बुकिंग करण्याचा सल्ला दिला. मात्र, डिलिव्हरीचा मेसेज आलेला असतानाही गॅस सिलिंडर प्रत्यक्षात मिळाला नाही तो सिलिंडर नेमका कोणाला देण्यात आला, याबाबत माहिती मिळाली नाही. तसेच गॅस कनेक्शन ट्रान्सफर करण्यासाठी माझ्याकडून तीन हजार रुपयांची मागणी करण्यात आली.
गणेश कोळी, ग््रााहक, पिंपळे गुरव
तक्रारींची दखल घेऊन कारवाई करण्यासाठी पथक पाठवण्यात येईल. नागरिकांनी पुढे येऊन तक्रारी कराव्यात. यासाठी आमचा संपर्क क्रमांक लवकरच सार्वजनिक करण्यात येईल. त्या क्रमांकावर नागरिकांनी आपापल्या तक्रारी नोंदवाव्यात. अनेक तक्रारी फोनवर सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल. तपासणीसाठी दोन पथके तयार करण्यात आली असून, त्यापैकी एक पथक कासारवाडी येथे पाठविण्यात येईल.
विजयकुमार क्षीरसागर, अन्नधान्य पुरवठा अधिकारी, निगडी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT