Abhishek Barne PCMC Pudhari
पिंपरी चिंचवड

Abhishek Barne PCMC Standing Committee: स्थायी समिती अध्यक्षपदी अभिषेक बारणे बिनविरोध

महापालिका तिजोरी सावरण्याचा निर्धार; आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडून अभिनंदन

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी भाजपाचे अभिषेक बारणे यांची बिनविरोध निवड झाली. निवडीबद्दल महापौर, पदाधिकारी, नगरसेवक तसेच, आयुक्तांकडून बारणे यांचे अभिनंदन करण्यात आले. विशेष सभा पीठासीन अधिकारी एम. जे. प्रदीप चंद्रन यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार (दि. 28) महापालिकेतील मधुकरराव पवळे सभागृहात झाली. राष्ट्रवादी काँग््रेासने उमेदवारी अर्ज दाखल न केल्याने बारणे यांचा एकमेव अर्ज वैध ठरला. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

निवडीनंतर अभिषेक बारणे यांचे महापौर रवी लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्यासह नगरसेवकांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच, आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी त्यांचे अभिनंदन केले. या वेळी अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, नगर सचिव मुकेश कोळप, मुख्य लेखा व वित्त अधिकारि विशेष अधिकारी प्रवीण जैन, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य लेखापरीक्षक प्रमोद भोसले, विभागप्रमुख उपस्थित होते. जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी सूत्रसंचालन केले.

महापालिका तिजोरीतील खटखडाट दूर करणार

सध्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे अध्यक्षपद सांभाळणे मोठे आव्हान आहे; मात्र मला आव्हाने स्वीकारायला आवडतात. त्यामुळे येत्या काळात शहराचा विकास करणे, महापालिकेचे उत्पन्न वाढविणे, यावर काम करणार आहे. त्यासाठी महापौर, उपमहापौर, विरोधी पक्षनेते यांची साथ आवश्यक आहे, असे स्थायी समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष अभिषेक बारणे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT