Petrol Pump Assault Pudhari
पिंपरी चिंचवड

Lonavala Petrol Pump Assault: लोणावळ्यात ₹1 वादातून पेट्रोल पंपावर हल्ला; कर्मचाऱ्यांना मारहाण

काचफोड, तोडफोड; 7 जणांसह अज्ञातांवर गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

लोणावळा: शहरातील एलआयसी बिल्डिंग शेजारी असलेल्या एका पेट्रोल पंपावर केवळ एक रुपया परत देण्याच्या क्षुल्लक कारणावरून ग््रााहकांनी मोठा राडा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

संतप्त जमावाने पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांना लाथाबुक्क्यांनी आणि लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. तसेच, पेट्रोल पंपाच्या ऑफिसच्या काचा फोडून मोठे नुकसान केले. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

गुरुवारी (दि. 26) दुपारी साडेतीन ते चार वाजेच्यादरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणी पेट्रोल पंप कर्मचारी नरेश बाळू गायकवाड (वय 33, रा. कार्ला, ता. मावळ) यांनी लोणावळा शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अनंत विठ्ठल कोळी (35), प्रसाद संभाजी कोळी (40), मच्छिंद्र विठ्ठल कोळी (वय 45), वेदिका वसंत कोळी (वय 23), विनंती प्रवीण मोकल (वय 21) (सर्व रा. पेण कोळीवाडा, ता. पेण, जि. रायगड) आणि इतर 4 ते 5 अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तुंगार्ली येथील देवेंद्र ऑटोलाईन भारत पेट्रोल पंप येथे नरेश गायकवाड आणि त्यांचे सहकारी उमेश महाप्रसाद मिश्रा (वय 43) हे ड्युटीवर होते. गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास काही ग््रााहक तिथे आले. या वेळी केवळ एक रुपया परत देण्याच्या कारणावरून ग््रााहकांचा कर्मचाऱ्यांसोबत वाद झाला.

ऑफिसची तोडफोड 7 जणांसह अज्ञातांवर गुन्हा दाखल

या वादानंतर साधारण अर्ध्या तासाने आरोपींनी बेकायदेशीररित्या जमाव जमवून पेट्रोल पंपावर पुन्हा प्रवेश केला. त्यांनी गायकवाड आणि मिश्रा यांना शिवीगाळ व दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच, सोबत आणलेल्या लोखंडी रॉडने मारहाण करून या दोघांना जखमी केले. या संतप्त जमावाने एवढ्यावरच न थांबता पेट्रोल पंपाच्या ऑफिसच्या काचांची तोडफोड करून मालमत्तेचे नुकसान केले. लोणावळा शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार खोपडे हे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT