Sweet Potato Pudhari
पिंपरी चिंचवड

Navratri Fasting Food Prices: नवरात्रीत उपवासाच्या पदार्थांना मागणी; रताळे, भुईमूग शेंगांचे दर तेजीत

पिंपरी-चिंचवडच्या बाजारपेठांत खरेदीसाठी गर्दी; रताळे ६० ते ८० रुपये किलो, ओल्या शेंगांचे दर १५० रुपयांपर्यंत

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: नवरात्री उत्सव सुरू होताच शहरात उपवासाच्या पदार्थांना मोठी मागणी वाढली आहे. नऊ दिवस उपवास करणाऱ्या भाविकांच्या संख्येत वाढ झाल्याने बाजारात रताळे, बटाटे, भुईमूग शेंगा आणि केळी, या पदार्थांची आवक वाढूनही दर तेजीत आहेत. पिंपरी-चिंचवडमधील मुख्य भाजी मंडई, भोसरी, वाकड, पिंपळे सौदागर येथील बाजारपेठांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून उपवासाच्या साहित्य खरेदीसाठी गर्दी दिसून येत आहे.

काय आहेत आजचे दर

रताळे : ६० ते ८० रुपये किलो, बटाटे : ३० ते ४० रुपये किलो, भुईमूग शेंगा (ओल्या) १२० ते १५० रुपये किलो, केळी : ६० ते ८० रुपये डझन, साबूदाणा : ९० ते ११० रुपये किलो, वरई २०० ते २४० रुपये किलो.

त्याचबरोबर केळी आणि भुईमूग शेंगाही उपवासात खाल्ल्या जातात. त्यामुळे फळबाजारातही केळीला मागणी वाढली आहे. एकंदरीत, देवीच्या उपासनेसोबतच उपवासाच्या पदार्थांमुळे बाजारपेठेलाही नवरात्रीत रेलचेल दिसून येत आहे.

विक्रेत्यांनी सांगितले की, अनेक जण नऊ दिवस धान्य वर्ज्य करून फळे आणि कंदमुळांवर उपवास करतात. त्यामुळे रताळे आणि बटाट्याला सर्वाधिक मागणी आहे. नवरात्रीत रताळे हे उपवासासाठी पोषक मानले जाते. त्यामुळे उपवासासाठी सगळेच रताळे खरेदी करतात. दोन दिवसांपासून माल हातात टिकत नाही, असे पिंपरी भाजी मंडईतील एका व्यापाऱ्याने सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT