Nane Gram Panchayat Pudhari
पिंपरी चिंचवड

Nane Gram Panchayat Negligence: नाणे ग्रामपंचायत कार्यालय कायम बंद; पाणीप्रश्न व तक्रारींचा खोळंबा

सरपंच–ग्रामसेवक अनुपस्थित, ग्रामस्थ संतप्त; प्रशासनाच्या उदासीनतेवर सवाल

पुढारी वृत्तसेवा

सोमाटणे: नाणे ग््राामपंचायत कार्यालय सतत बंद असल्यामुळे लोकांची कामे रखडली आहेत. नाणे मावळातील नाणे या गावातील ग््राामपंचायत ही अनेक वेळा बंद असते. कधीकधी तर दरवाजा उघडा असतो, पण कार्यालयात कोणीच उपस्थित नसते. ना सरपंच ना ग््राामसेवक.

प्राप्त माहितीनुसार, कर्मचारी तर कधी कधी दरवाजा उघडा ठेवून बाहेर असतात, त्यामुळे ग््राामपंचायत कार्यालयात कोणीही येऊन बसते. ग््राामपंचायत कार्यालयाचा निष्काळजीपणा जाणवतो. त्या कार्यालयाची गांभीर्यता ग््राामपंचायतीला दिसून येत नाही. कारण गावातील नागरिक त्यांच्या वैयक्तिक कामासाठी तसेच त्यांच्या काही तक्रारी ग््राामपंचायतमध्ये येऊन मांडायच्या असतात, पण त्या तक्रारी घ्यायला व तसेच कार्यालय माहिती देण्यास कोणीही उपस्थित नसते. त्यामुळे नागरिकांना याचा विनाकारण त्रास होत आहे.

येथे नोंदही आढळत नाही. असे येथील ग््राामस्थ सांगतात. जर ग््राामपंचायतमध्येच कोणी नसेल तर ग््राामपंचायत कार्यालयाचा उपयोग काय? असे प्रश्न उपस्थित केला जात आहे. सरपंच आढारी या तर कार्यालयात कधीच फिरकत नाहीत. शक्यतो त्यांचे पतीदेव कार्यालयामध्ये आढळून येतात. त्यामुळे कधी कधी नक्की सरपंच कोण, असाही प्रश्न पडत आहे. कार्यालय बंद असणे हे आता नित्याचे झाले आहे. त्यामुळे नागरिक या कार्यालयाबद्दल संताप व्यक्त करत आहेत.

नाणे गावात पाण्याची समस्या सर्वात मोठी आहे. या सदर्भात भेटण्यासाठी कार्यालयात आले असता येथे कोणीच भेटत नाही. आम्ही आमच्या मागण्या, तक्रारी व आमची कामे कोठे घेऊन जाऊ, असे प्रश्न नागरिक विचारत आहेत. या संदर्भात सरपंचांना फोन केला असता सरपंच फोन उचलत नाहीत. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया प्राप्त झालेली नाही.

गेली वीस दिवस आमच्या नळाला पाणी येत नाही. यासंदर्भात आम्ही वारंवार ग््राामपंचायतीकडे तक्रार द्यायला गेलो असता कार्यालय बंद असते. त्यामुळे लिखित तक्रार देता येत नाही. फोन केला असता सरपंच फोन न उचलता त्यांचे पती फोनवर आम्हाला उत्तर देतात व आज करू, उद्या करू दोन-तीन दिवसांत करू अशी उत्तरे देतात. मासिक मीटिंगमध्येही प्रश्न मांडला असता त्यावेळेस पाणीप्रश्न सोडवण्यात येईल असे सांगतात. पण, प्रत्यक्षात कार्यवाही काही होत नाही.
सिकंदर मुलाणी, ग््राामस्थ नाणे
मला दोन गावांचा भार असल्यामुळे व मुंडढावरे गाव हे माझे मूळ कार्यालयाचे ठिकाण असून, नाणे हे मला तात्पुरता कार्यभाग करण्यासाठी दिला आहे. तसेच कामाचा लोड जास्त असल्यामुळे मला दोन्ही ग््राामपंचायतींना पुरेसा वेळ देता येत नाही. पण आठवड्यातून दोन ते तीन वेळा मी नाणे ग््राामपंचायतमध्ये असतो. या काळात जेवढी असेल तेवढी लोकांची कामे करून घेतो. त्यामुळे पहिल्यापेक्षा तक्रारी आता कमी आहेत.
परमेश्वर गोमसाळे, ग््राामसेवक, नाणे
आमच्याकडे पाण्याची मोठी ओरड आहे. पाणी आम्हाला मिळत नाही. यासंबंधी आम्ही सरपंचांना फोन केला असता त्यांचे पती अरेरावीची भाषा करतात. मग आमची तक्रार आम्ही मांडायची कोठे?
दत्तात्रय किंजल, ग््राामस्थ नाणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT