Moshi Swimming Pool Accident Pudhari
पिंपरी चिंचवड

Moshi Swimming Pool Accident: मोशी जलतरण तलावात 11 वर्षीय मुलीचा पाय जाळीत अडकला

सुरक्षेच्या दुर्लक्षामुळे अर्धा तास अडकलेली मुलगी; वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे पालकांमध्ये संताप

पुढारी वृत्तसेवा

मोशी: यमुनानगर येथील मीनाताई ठाकरे जलतरण तलावात एक धक्कादायक आणि तितकीच चिंताजनक घटना समोर आली आहे. येथे पोहण्यासाठी आलेल्या अर्णवी दारफळे या 11 वर्षीय मुलीचा पाय घसरून तलावाच्या बाजूला असलेल्या सिमेंटच्या चेंबरच्या जाळीत अडकला. चिमुरडीस असह्य वेदना झाल्या. ती जोरजोरात रडू लागली. या घटनेमुळे येथील नागरिकांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर संताप व्यक्त केला आहे.

अखेर उपस्थित नागरिक आणि कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नानंतर तब्बल अर्ध्या तासाने या मुलीचा पाय बाहेर काढण्यात यश आले. मात्र, या दुर्लक्षामुळे सर्व पालकांनी तीव संताप व्यक्त केला. मिळालेल्या माहितीनुसार, अर्णवी जलतरण तलावाच्या काठावर असताना अचानक तिचा पाय घसरला आणि तो थेट सिमेंटच्या जाळीच्या फटीत गेला.

पाय इतका घट्ट अडकला होता की तो सहज काढणे अशक्य झाले होते. शेवटी छनी आणि हातोड्याच्या साहाय्याने ती सिमेंटची जाळी अत्यंत काळजीपूर्वक तोडण्यात आली आणि त्यानंतरच मुलीचा पाय सुखरूप बाहेर काढता आला. या संपूर्ण प्रकारात मुलीच्या पायाला दुखापत झाली असून, तिच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत.

आत्तापर्यंत चारवेळा घडल्या घटना

लावाच्या सुरक्षेबाबतचा हा पहिलाच प्रकार नसून, आतापर्यंत अशा स्वरूपाच्या चार घटना येथे घडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वारंवार घडणाऱ्या या प्रकारांमुळे लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जलतरण तलावाच्या बाजूला असलेल्या सिमेंटच्या जाळीमधील किंवा चेंबरमधील गॅप जास्त असल्यामुळेच लहान मुलांचे पाय त्यात अडकत आहेत.

त्यामुळे हा गॅप तातडीने कमी करावा किंवा मुलांचे पाय अडकणार नाहीत अशा पद्धतीची सुरक्षित पर्यायी व्यवस्था तिथे करावी, अशी आग््राही मागणी आता संतप्त पालकांकडून केली जात आहे. कोणत्याही मोठ्या दुर्घटनेपूर्वी प्रशासनाने जागे व्हावे, असा सूर पालकांमध्ये आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT