वडगाव मावळ: मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढविण्याचा निर्णय तालुक्यातील काँग््रेास, राष्ट्रवादी काँग््रेास शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना (उबाठा), मनसे व वंचित बहुजन आघाडी या पाच पक्षांनी घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या 5 व पंचायत समितीच्या 10 अशा सर्व जागा महाविकास आघाडी लढविणार असल्याचे संबंधित पक्षांच्या प्रमुखांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.
पत्रकार परिषदेस काँग््रेासचे तालुकाध्यक्ष यशवंत मोहोळ, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय पडवळ, शिवसेना उबाठा गटाचे नेते भारत ठाकूर, मनसेचे तालुकाध्यक्ष अशोक कुटे, वंचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष लोखंडे यांच्यासह काँग््रेासचे सहादु आरडे, गणेश काजळे, विशाल वाळुंज, राजेश फलके, शिवसेनेचे उमेश गावडे आदी उपस्थित होते.
काँग््रेासचे तालुकाध्यक्ष यशवंत मोहोळ म्हणाले, की शाहू-फुले-आंबेडकरांची विचारधारा घेऊन आम्ही या निवडणुकांना एकत्रितपणे सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे. हीच विचारधारा घेऊन आम्ही नुकत्याच झालेल्या नगर परिषद नगरपंचायत निवडणूकामध्ये तालुक्यात राष्ट्रवादी काँग््रेास सोबत जाण्याचा निर्णय घेतला, परंतु आम्ही ज्या जातीयवादी विचारांना दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो त्यांनाच ते जवळ करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले.
80 टक्के जागावाटप पूर्ण
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय पडवळ यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढण्याचा निर्णय पक्का झाला असल्याचे सांगून जागावाटपही 80 टक्के पूर्ण झाले आहे. जागावाटपानुसार आम्ही त्या त्या पक्षांच्या चिन्हावरच निवडणुका लढणार असल्याचे सांगितले. पक्षाच्या वरिष्ठांकडून काहीही आदेश आला तरी तालुक्यात आम्ही आघाडीच्या माध्यमातूनच लढणार असल्याचेही स्पष्ट केले.
वंचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष लोखंडे म्हणाले, की काँग््रेासकडून आम्हाला आघाडीत समाविष्ट होण्याचा प्रस्ताव आला होता, त्यास आम्हीही तयारी दर्शवली आहे. तालुक्यात लोकशाही संपुष्टात आणण्याचे काम दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून तालुक्यात होत आहे. त्यामुळे आम्ही आघाडीत समाविष्ट होऊन निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला आहे. मनसेचे तालुकाध्यक्ष अशोक कुटे यांनीही तालुक्यात विरोधी पक्ष समविण्याचा प्रयत्न सुरू असून, मनसेने उमेदवार दिला नाही तरी आघाडीसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेचे उमेश गावडे यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढविणार असल्याचे सांगितले.