Pune Jilha Parishad Pudhari
पिंपरी चिंचवड

Maval ZP Committee Chairperson: मावळला जिल्हा परिषद सभापतीपदाचा मान; दीपाली हुलावळे यांची निवड

अध्यक्ष-उपाध्यक्ष पद हुकले तरी बांधकाम व आरोग्य समितीवर मावळचा झेंडा; ग्रामीण विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा

पुढारी वृत्तसेवा

गणेश विनोदे

वडगाव मावळ: पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्षपद मावळ तालुक्याला हुकले असले तरी बांधकाम व आरोग्य या महत्त्वाच्या समितीचे सभापतीपद दीपाली हुलावळे यांच्या रूपाने मिळाल्याने तालुक्यात उत्साहाचे वातावरण आहे. यानिमित्ताने मावळ तालुक्याला चौथ्यांदा जिल्हा परिषद सभापतीपदाचा मान मिळाला आहे.

अध्यक्षपद दौंडला

दरम्यान, मावळ तालुक्याला या वेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद देणार असा शब्द दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला होता. त्यामुळे मावळला या वेळी तरी अध्यक्षपद भेटेल अशी अपेक्षा होती; परंतु जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद दौंड तालुक्याला तर उपाध्यक्षपद आंबेगाव तालुक्याला मिळाले. त्यामुळे मावळ तालुक्याला अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची संधी हुकल्याने सभापतीपद मिळणार हे जवळपास निश्चित मानले जात होते. त्यानुसार, अपेक्षेप्रमाणे आज झालेल्या विषय समिती निवड प्रक्रियेत मावळ तालुक्याला बांधकाम व आरोग्य या महत्त्वाच्या समितीचे सभापतीपद मिळाले.

मावळला चौथ्यांदा मिळाली सभापतीपदाची संधी

यापूर्वी, स्व. दिलीप टाटीया हे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती होते. त्यानंतर अतिश परदेशी समाजकल्याण समितीचे सभापती झाले. मागील पंचवार्षिक काळात बाबूराव वायकर हे कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती होते. एकंदर मावळ तालुक्याला यापूर्वी तीन वेळा सभापती होण्याचा मान मिळाला होता. आता दीपाली हुलावळे यांच्या रूपाने चौथ्यांदा सभापती पद मिळाले आहे.

ग््राामीण विकासाला मिळणार गती

पुणे जिल्हा परिषदेच्यादृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या बांधकाम व आरोग्य समितीच्या सभापती पदाची संधी मावळ तालुक्याला मिळाली असून, पंचायत समितीमध्येही एकहाती सत्ता आहे. या दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्था ह्या ग््राामीण भागाच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असतात. या दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांवर राष्ट्रवादी काँग््रेासचे एकहाती वर्चस्व असून, महत्त्वाचे पदही मिळाले आहे. त्यामुळे मावळ तालुक्याच्या ग््राामीण भागातील विकासाला मोठी चालना मिळण्याचे संकेत आहेत. मावळ तालुका पवन मावळ, नाणे मावळ, आंदर मावळ अशा तीन भागात विखुरला असून, पर्यटनाच्यादृष्टीने ग््राामीण भागाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून गेली सहा वर्षे तालुक्यात भरीव विकासकामे व विविध प्रकल्प मार्गी लागले आहेत. पर्यटनाच्यादृष्टीने आमदार शेळके सातत्याने पर्यटनशील आहेत. आता जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून ग््राामीण विकासासाठी तसेच पर्यटन विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होऊ शकतो, त्यामुळे मावळच्या ग््राामीण भागातील विकासाला गती मिळणार आहे.

तालुक्यातील सर्व जागा राष्ट्रवादीकडे

आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली मावळ तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 5 व पंचायत समितीच्या 10 अशा सर्व 15 जागांवर राष्ट्रवादी काँग््रेासने दणदणीत विजय मिळवून तब्बल 22 वर्षे भाजपची सत्ता असलेली मावळ पंचायत समिती ताब्यात घेतली. तर, जिल्ह्याच्यादृष्टीने जिल्हा परिषदेच्या पाचही जागांवर विजय मिळवत मावळची ताकद वाढवली होती.

मावळच्या राजकारणात राष्ट्रवादीचा बोलबाला

तब्बल 25 वर्षे भाजपचे वर्चस्व असलेल्या मावळ तालुक्यात विधानसभेतील विजयानंतर जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सर्व 15 जागा मिळवून एकहाती विजय मिळवला. तसेच, मावळ पंचायत समितीमध्ये सभापतीपदी सुनीता येवले, उपसभापतीपदी साहेबराव कारके यांची निवड झाली. तर, जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य या प्रमुख समितीवर दीपाली हुलावळे यांना सभापती होण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे मावळ तालुक्यात आमदार, पंचायत समितीचे सभापती, उपसभापती तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीचे नवनिर्वाचित 15 पदाधिकारी, जिल्हा परिषदेचे सभापती, खरेदी-विक्री संघ व खादी ग््राामोद्योग संघाचे सभापती याशिवाय राष्ट्रवादी काँग््रेासचे जिल्हाध्यक्ष पद विठ्ठलराव शिंदे यांच्या रूपाने मावळ तालुक्यात आहे. तसेच, लोणावळा नगर परिषद, वडगाव नगरपंचायतचे नगराध्यक्ष, तळेगाव नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष अशी प्रमुख पदे राष्ट्रवादीच्या गोटात आल्यामुळे मावळ तालुका राष्ट्रवादीमध्ये अत्यंत उत्साही वातावरण निर्माण झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT