Death News Pudhari
पिंपरी चिंचवड

Maval Woman Death Case: कातवीतील व्हीटीपी अर्बन लाईफ सोसायटीत आठव्या मजल्यावरून पडून महिलेचा मृत्यू

बाल्कनीत लटकलेल्या अवस्थेत नागरिकांनी वाचविण्याचा प्रयत्न; हात निसटल्याने दुर्दैवी घटना

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: मावळ तालुक्यातील कातवी येथील व्हीटीपी अर्बन लाईफ सोसायटीमध्ये आठव्या मजल्यावरून पडून एका 34 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. 9) दुपारी दीड वाजताच्या सुमारास घडली. प्रतिभा मनीष शंकर (रा. व्हीटीपी अर्बन लाईफ सोसायटी, कातवी, मावळ) असे मृत महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतिभा शंकर या दुपारच्या सुमारास त्यांच्या घराच्या बाल्कनीत आठव्या मजल्यावर लटकलेल्या अवस्थेत सोसायटीतील नागरिकांना दिसल्या. त्या काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होत्या. परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेत गॅलरीतून त्यांना हात देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा हात निसटल्याने त्या खाली पडल्या.

या घटनेत प्रतिभा शंकर यांचा जागीच मृत्यू झाला. माहिती मिळताच तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास तळेगाव एमआयडीसी पोलीस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT