Land Acquisition Pudhari
पिंपरी चिंचवड

Maharashtra MIDC Land Acquisition: मावळमध्ये एमआयडीसीला ग्रामस्थांचा विरोध; जमीन संपादनावर ठाम भूमिका

जमीन संपादन नको; ग्रामसभांमध्ये एकमुखी ठराव, प्रकल्प रद्दची मागणी

पुढारी वृत्तसेवा

उर्से मावळ: मावळ तालुक्यातील करुंज व बऊर ग््राामपंचायत तसेच बाह्मणवाडी परिसरात आयोजित विशेष ग््राामसभांमध्ये प्रस्तावित एमआयडीसी स्थापन करण्यासाठी करण्यात येणाऱ्या जमीन संपादनास ग््राामस्थांनी एकमुखाने विरोध दर्शविला. सभांमध्ये शेतकऱ्यांच्या अडचणी व मागण्यांवर चर्चा झाली.

ग््राामसभेत मांडलेल्या ठरावानुसार, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करू नयेत, अशी भूमिका घेण्यात आली. शेतकर्यांना देण्यात येणाऱ्या नोटीस मागे घेण्याची मागणी करण्यात आली.

ग््राामस्थांनी स्पष्ट केले की, 2006 पासून या भागातील जमिनीवर विविध शिक्के मारण्यात आले. त्याचा शेतकऱ्यांवर मोठा परिणाम झाला. अल्पभूधारक शेतकऱ्यांचे क्षेत्र एमआयडीसीमध्ये समाविष्ट करू नये, संपादित होणाऱ्या क्षेत्रातील बागायती जमिनींची प्रत्यक्ष पाहणी करावी.

याशिवाय 1995-96 दरम्यान द्रुतगतीमार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी आधीच संपादित झालेल्या आहेत. उर्वरित जमिनीवरच त्यांचा उदरनिर्वाह सुरू असून, त्यादेखील संपादित झाल्यास शेतकरी भूमिहीन होण्याची भीती व्यक्त करण्यात आली.

प्रस्तावित एमआयडीसी प्रकल्प रद्दची मागणी

करुंज, बऊर, राऊतवाडी व लोखंडवाडी परिसरातील ग््राामस्थांनी या एमआयडीसी प्रकल्पाला तीव विरोध दर्शवित प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली. प्रस्तावित एमआयडीसी क्षेत्रात मागील 30-40 वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या शेतकऱ्यांचे संसार उद्ध्‌‍वस्त होण्याची शक्यता असल्याचेही सभेत नमूद करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT