Tiger Point Pudhari
पिंपरी चिंचवड

Lonavala Tiger Point Accident: लोणावळ्यातील टायगर पॉईंटवर मोठी दुर्घटना; दरीत पडून मायलेकी गंभीर जखमी

शिवदुर्ग रेस्क्यू टीम, स्थानिक दुकानदार आणि नागरिकांच्या धाडसामुळे दोघींना वाचवण्यात यश; उपचारासाठी रुग्णालयात दाखल

पुढारी वृत्तसेवा

लोणावळा: लोणावळ्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या टायगर पॉईंट येथील दरीत पडून आई आणि मुलगी गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिक दुकानदार आणि नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे व तातडीच्या मदतीमुळे या दोघींचे प्राण थोडक्यात वाचले आहेत.

सोनाली शिवराज गजभार (वय ३७) व मनाली शिवराज गजभार (वय १२) असे या दरीत पडलेल्या माय-लेकींची नावे आहेत. सोमवारी (दि. १९) दुपारी सुमारे १२ वाजता शिवदुर्ग रेस्क्यू टीमला एक फोन आला, ज्यामध्ये टायगर पॉईंटवरून एक महिला आणि लहान मुलगी दरीत पडल्याची माहिती देण्यात आली.

ही माहिती मिळताच टीमने तातडीने लोणावळा ग्रामीण पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली आणि रुग्णवाहिकेलादेखील पाचारण केले. यानंतर शिवदुर्ग रेस्क्यू टीम, स्थानिक दुकानदार व नागरिकांनी धाडस दाखवत दोरीच्या साहाय्याने खाली उतरून त्या दोघींना सुखरूप वर आणले. त्यानंतर जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात रवाना करण्यात आले.

शिवदुर्ग रेस्क्यू पथकाचे सागर कुंभार, सागर दळवी, कपिल दळवी, सिद्धेश कुटे, अनिकेत घरदाळे, अनिकेत आंबेकर, आयुष वर्तक, करण वरे, योगेश उंबरे, आदिती गायकवाड, गणेश भांगरे, प्रणय अंबुरे, समर्थ गंभीर, महादेव भवर, पिंटू मानकर, प्रभाकर भालेराव, मनोहर ढाकोळ आणि सुनील गायकवाड यांसह स्थानिक नागरिक आणि शिवदुर्ग रेस्क्यू टीमने दाखविलेल्या धाडसाचे कौतूक होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT