लोणावळा: लोणावळा नगर परिषदेच्या वरसोली येथील कचरा डेपोवर सुरू असलेल्या बायोमायनिंग कामामुळे परिसरात तीव दुर्गंधी पसरली आहे. यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. घरामध्ये व घराच्या आजूबाजूला उभे राहणेही कठीण झाले असून, श्वसनासंबंधी त्रास वाढत असल्याची तक्रार नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
मागील काही दिवसांपासून डेपोवरील कचऱ्याच्या ढिगाऱ्यांवर जेसीबी व पोकलेन मशीनच्या सहाय्याने वर-खाली करण्याचे काम सुरू आहे. या प्रक्रियेदरम्यान ढिगाऱ्याखाली साचलेला जुना कचरा उघडा पडत असून, त्यातून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत आहे. वाऱ्याच्या दिशेनुसार हा उग््रा वास वरसोली, वाकसई चाळ, वाकसई, सदापूर, वलवण आणि डोंगरगाव या गावांपर्यंत पोहोचत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वारंवार सूचना देऊन व आंदोलनाचा इशारा देऊनही नगर परिषदेच्या कारभारात सुधारणा होत नसल्याचा आरोप करत संबंधित ग््राामपंचायतींनी प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास वरसोली कचरा डेपोला टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे प्रशासन याबाबत काय भूमिका घेते, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
व्यावसायिक, ग््राामस्थ त्रस्त
चार ते पाच गावांच्या मध्यभागी असलेल्या या डेपोवर काम करताना दुर्गंधी नियंत्रणासाठी विशिष्ट रसायनांची फवारणी करणे आवश्यक असते. मात्र, खर्च वाचवण्यासाठी ठेकेदार व नगरपरिषद प्रशासनाकडून कोणत्याही केमिकलचा वापर न करता थेट कचरा हलवला जात असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. परिणामी परिसरातील वातावरण असह्य झाले आहे. या कचरा डेपोला लागूनच मुंबईड्ढपुणे राष्ट्रीय महामार्गावरील वरसोली टोलनाका आहे. येथे रात्रंदिवस कर्मचारी कार्यरत असतात. टोलनाक्याच्या दोन्ही बाजूंना असलेल्या टपऱ्या व हॉटेलांमध्ये प्रवासी मोठ्या संख्येने थांबत असतात. या सर्वांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत असून, आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
नागरिकांचा लोकप्रतिनिधींना इशारा
लोणावळा नगर परिषदेच्या काही नगरसेवकांनी व नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांनी नुकतीच वरसोली कचरा डेपो येथे भेट देत या ठिकाणी बायोमायनिंगचे काम करत असलेल्या ठेकेदाराला देण्यात आलेल्या पैशाची चौकशी केली आहे. मात्र या भागामध्ये पसरत असलेली दुर्गंधी व त्यामुळे स्थानिकांना होत असलेला त्रास याकडे मात्र कानाडोळा केला आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व नगरसेवकांवर संताप व्यक्त करत ठेकेदाराच्या पैशाची चौकशी जरूर करा, मात्र स्थानिकांना होत असलेला त्रासाकडे पहिले लक्ष द्या, अन्यथा वरसोली कचरा डेपोला टाळे ठोकत लोणावळा शहरामध्ये कचराकोंडी केली जाईल हे ध्यानात ठेवा, असा सक्त इशारा दिला आहे.
लोणावळा नगर परिषदेच्या वरसोली येथील कचरा डेपोवरील दुर्गंधीमुळे स्थानिक नागरिक अक्षरशः हैराण आहेत. अतिशय उग््रावास परिसरामध्ये येत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ग््राामपंचायतीच्या माध्यमातून लोणावळा नगर परिषदेला अनेक वेळा पत्रव्यवहार केले आहेत. अधिकाऱ्यांना अनेक वेळा फोन करूनदेखील तक्रारी सांगितले आहेत. तरीदेखील योग्य दखल घेतली जात नाही. कोणत्याही प्रकारचे कल्चर व केमिकल फवारणी या ठिकाणी केली जात नसल्यामुळे नागरिकांना गावात राहणे मुश्किल होऊ लागले आहे. नगरपरिषदेचा हा कचरा डेपो वरसोली ग््राामपंचायतीच्या हद्दीमध्ये आहे. नगर परिषदेने योग्य दखल न घेतल्यास पुढील योग्य ती कार्यवाही ग््राामपंचायतकडून केली जाईल.संजय खांडेभरड, सरपंच