Lonavala Rain Waterlogging Pudhari
पिंपरी चिंचवड

Lonavala Rain Waterlogging: लोणावळ्यात पावसाचा कहर; एकवीरा देवी गडाकडे जाणारा रस्ता पाण्याखाली

रस्त्यावर पाण्याचे लोट, गडाच्या पायऱ्यांवरूनही वाहतेय पाणी; अपुऱ्या निचरा व्यवस्थेमुळे नागरिक आणि वाहनचालक त्रस्त

पुढारी वृत्तसेवा

लोणावळा: शहर व परिसरामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आई एकवीरा देवीच्या गडाकडे जाणाऱ्या रस्ता पाण्याखाली गेला आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले असल्याने चालकांना वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागत होती.

गडाच्या पायऱ्यांवरुन वाहतेय पाणी

गावातील नागरिकांना व रिक्षा चालकांनादेखील याचा मोठा फटका बसला. आई एकवीरा देवीच्या गडावर जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण मागील एक वर्षापासून रखडले आहे. पावसामुळे रस्त्यावरून पाण्याचे मोठे लोट वाहत आहेत. या पाण्यासोबत दगडदेखील रस्त्यावर वाहून आल्याने वाहन चालवताना चालकांना ॲडव्हेंचर अनुभव येत आहे. गडाच्या पायऱ्यांवरूनदेखील मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे.

नागरिकांना नाहक त्रास

आई एकवीरा देवीच्या मंदिराकडे जाणाऱ्यासाठी कार्ला फाटा ते वेहेरगाव दरम्यान सिमेंट रस्ता बनविण्यात आला आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूने गटारेदेखील बांधण्यात आली आहेत. मात्र, रस्त्यावरील पाणी गटारात जाण्यासाठी योग्य सुविधा उपलब्ध नसल्याने पाणी रस्त्यावरच साचत आहे. हा रस्ता झाल्यानंतर या भागातील रस्त्यावर पाणी साचण्याची समस्या सुटले, अशी नागरिकांना अपेक्षा होती मात्र ती फोल ठरली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

कार्ला फाटा ते वेहेरगाव दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात बांधकामे झाली आहेत. रस्त्याच्या बाजूने पूर्वी कितीही पाऊस पडला तरी पाणी वाहून जात असे. आता बांधकामामुळे व त्यांच्या संरक्षण भिंतींमुळे पाणी वाहून जाण्यास अडथळे येत आहेत. त्यातच रस्त्यावरील पाणी नाल्यात जाण्याची योग्य सोय नसल्याने या रस्त्यावर कायम पाणी साचत आहे. मात्र, ही समस्या सोडविण्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT