लोणावळा: मावळ तालुक्यामधील लोणावळा व तळेगाव नगर परिषद तसेच वडगाव नगरपंचायतीच्या निकालानंतर तालुक्यातील राजकीय पक्षांकडून मिशन जिल्हा परिषद व पंचायत समिती सुरू करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग््रेास पक्ष व भाजप या प्रमुख पक्षांसह शिवसेना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काँग््रेास शरद पवार पक्ष व काँग््रेास या पक्षांकडून इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून मोठंमोठे कार्यक्रम घेत मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.
देवदर्शन, सहलींचे आयोजन
लोणावळा शहरालगतचा दुसरा जिल्हा परिषदेचा मोठा व महत्त्वाचा गट समजल्या जाणाऱ्या कार्ला खटकाळा या जिल्हा परिषद गटामधील आरक्षण सर्वसाधारण महिला असल्यामुळे या ठिकाणी भाजपकडून माजी जिल्हा परिषद सदस्य बाबूराव वायकर यांच्या सौभाग्यवती आशा वायकर व राष्ट्रवादी काँग््रेास पक्षाकडून माजी पंचायत समिती सदस्य दीपक हुलावळे यांच्या सौभाग्यवती, कार्ला गावच्या माजी सरपंच दीपाली हुलावळे इच्छुक आहेत. या ठिकाणी पंचायत समितीचे सदस्य पददेखील महिलांसाठी आरक्षित असल्यामुळे या ठिकाणी वेहेरगावच्या गावच्या माजी सरपंच रेश्मा राजू देवकर, शिलाटणे गावच्या माजी सरपंच संगीता गणपत भानुसघरे या राष्ट्रवादी काँग््रेास पक्षाकडून तर भाजपकडून वेहेरगावच्या माजी सरपंच रंजना सुरेश गायकवाड या इच्छुक असून, सर्वच उमेदवारांनी मतदारसंघांमध्ये मोठंमोठे कार्यक्रम घेत तसेच देवदर्शनाच्या विविध फेऱ्या करत मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे.
निवडणूक जाहीर होण्याआधीच इच्छुकांनी मतदारसंघ काढला पिंजून
जिल्हा परिषद व पंचायती समितीसाठी इच्छुक असलेले सर्वच उमेदवार हे मातब्बर व आर्थिकदृष्ट्या समृद्ध असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या चुरशीच्या लढती पाहायला मिळणार आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग््रेास व भाजपकडून जोरदार प्रयत्न केले जाणार आहेत. उमेदवार मातब्बर असल्यामुळे वैयक्तिक पातळीवरदेखील मोठ्या स्वरूपामध्ये लढत होणार आहे. नगर परिषद व नगरपंचायतीच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग््रेासच्या आशा मोठ्या प्रमाणात पल्लवी झाल्या आहेत तर, या निवडणुकांमध्ये ज्या चुका झाल्या त्या चुका दुरुस्त करत भाजपकडून जिल्हा परिषदेसाठी नव्याने रणनीती राखत त्या जागा ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा अद्याप झालेली नाही. मात्र, तत्पूर्वीच सर्व इच्छुकांनी मतदारसंघ अक्षरशः पिंजून काढला आहे. त्यामुळे या निवडणुका घोषित होण्याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
उमेदवारी मिळविण्यासाठी रस्सीखेच
मिनी विधानसभा म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषदेसाठी मावळ तालुक्यामध्ये अनेक मातब्बर इच्छुकांनी आपली इच्छा व्यक्त केली असून, ज्या ठिकाणी सर्वसाधारण आरक्षण आले आहे, त्या ठिकाणी स्वतः, ज्या ठिकाणी महिला आरक्षण आले आहे त्या ठिकाणी मातब्बर व्यक्तींच्या सौभाग्यवती तसेच ज्या ठिकाणी नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षण आले आहे, त्या ठिकाणी ओबीसी दाखला मिळवत मातब्बर मंडळींनी निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. लोणावळा शहराजवळील व अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या कुसगाव काले या जिल्हा परिषद गट तसेच पंचायत समितीच्या दोन्ही जागा या सर्वसाधारण आल्यामुळे या ठिकाणी मोठी रस्सीखेच सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.
पंचायत समितीकडे दुर्लक्ष
जिल्हा परिषदेसाठी भाजपकडून माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय ऊर्फ भाऊसाहेब गुंड, राष्ट्रवादी काँग््रेास पक्षाकडून संतोष राऊत व अशोक राजिवडे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून तालुकाप्रमुख आशिष ठोंबरे यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. या ठिकाणचा पंचायत समिती गणदेखील सर्वसाधारण असला तरी बहुतांश सर्वच इच्छुकांनी जिल्हा परिषदेसाठी आपली इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे पंचायत समितीला अद्याप तरी या ठिकाणी फार कोणी इच्छुक असल्याचे दिसून येत नाही. जिल्हा परिषदेसाठी इच्छुक असलेल्या वरील सर्वच उमेदवारांनी मोठंमोठे कार्यक्रम मतदारसंघामध्ये घेत जास्तीत जास्त मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.