VIP Numbers Pudhari
पिंपरी चिंचवड

HSRP Number Plate Enforcement: एचएसआरपी नंबर प्लेटसाठी अंतिम मुदत संपत आली; १ जुलैपासून कडक कारवाई

पिंपरी-चिंचवडसह पुण्यात लाखो वाहने अजूनही विना एचएसआरपी; नियम न पाळणाऱ्यांवर दंडाचा बडगा

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: केंद्र व राज्य शासनाने सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट (एचएसआरपी) अनिवार्य केली आहे. १ एप्रिल २०१९ नंतरच्या नव्या वाहनांना कंपनीकडून नंबर प्लेट मिळत होती. १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत झालेल्या सर्व वाहनांना आता (एचएसआरपी) बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे.

मात्र शहरातील अनेक वाहने हे विना एचएसआरपी नबंरप्लेटशिवाय धावत आहे. वारंवार मुदतवाढ देऊनही एचएसआरपी नबंर प्लेटबाबत वाहनधारकांमध्ये उदासीनता दिसून येत असून, मंगळवार (दि. ३०) जून रोजी नंबरप्लेट बसविण्याची मुदत संपत आहे.

परिवहन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार ३१ डिसेंबर २०१९ अखेर सुमारे १४ लाख ६७ हजार ७४२ वाहने नोंदणीकृत होती. या वाहनांना सुरक्षेच्या दृष्टीने एचएसआरपी नबंर प्लेट बसविणे बंधनकारक आहे. आधिकृत आकडेवारीनुसार, नोंदणीकृत वाहनांपैकी १० जून २०२६ पर्यंत केवळ ६ लाख २८ हजार ६२४ वाहनमालकांनी एचएसआरपी बसविण्यासाठी ऑनलाइन नोंदणी केली आहे. यामधील केवळ ५ लाख २६ हजार ७२० वाहनांवरच प्रत्यक्ष एचएसआरपी बसविण्यात आली आहे.

सुमारे ८ लाख ३९ हजार वाहनांनी एचएसआरपीसाठी अद्याप नोंदणीच केली नाही. नोंदणी केलेल्या वाहनधारकांना अद्याप नबंर प्लेट बसवून घेतलेली नाही. शहरात अजूनही लाखो वाहने एचएसआरपी नंबरप्लेटविना रस्त्यावर धावत आहे. अनेकदा मुदतीवाढ देऊनही निम्म्याहून अधिक वाहन चालकांनी ही प्रकिया पूर्ण केली नसल्याचे आकडेवारीवरुन निर्देशनास येत आहे.

सर्वो्च्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्यातील २०१९ पुर्वीच्या सर्व वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. या प्रणालीचा मुख्य उद्देश वाहन सुरक्षा वाढविणे आणि बनावट नबंरप्लेट आळा घालणे असा आहे. एचएसआरपी नंबरप्लेट नसलेल्या वाहनांवर १ जुलै २०२६ पासून दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
राहुल जाधव प्रादेशिक परिवहन अधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT