पिंपरी: वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी शहर पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. शहरातील 62 प्रमुख मार्गांवर सकाळी व सायंकाळी ठराविक वेळेत सर्व प्रकारच्या जड आणि अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. काही ठिकाणी ही बंदी पूर्णवेळ असून, अत्यावश्यक सेवेतील वाहनांना यामध्ये सवलत देण्यात आली आहे.
सकाळी 8 ते 12 आणि सायंकाळी 4 ते 9 या वेळेत बहुतेक मार्गांवर ही बंदी राहील, तर काही मार्गांवर सकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत किंवा पूर्ण वेळ बंदी लागू आहे. वाहतूक पोलिस उपआयुक्त विवेक पाटील यांच्या आदेशानुसार ही अधिसूचना जारी करण्यात आली आहे. (Latest Pimpri News)
ठिकाणे :
तळवडे: त्रिवेणीनगर ते तळवडे गावठाण ते आयटी चौक ते महिंद्रा कंपनी, परंवडवाल चौक, खंडेवाल चौक, तळवडे गावठाण ते डायमंड चौक, रामकृष्ण हरी चौक, कुदवळवाडी ब्रिज, कृष्णा चौक, साने चौक, पिंगळे चौक, सोनवणेवस्ती.
निगडी: भक्ती शक्ती चौक ते त्रिवेणीनगर, दुर्गाचौक ते टिळक चौक, थरमॅक्स चौक ते खंडोबामाळ, चिखली पोलिस स्टेशन ते शाहुनगर, डी.वाय.पाटील रस्ता ते हॅगिंग ब्रिज, संभाजी चौक ते खंडोबामाळ चौक
चिंचवडः रिव्हर व्हयु चौक ते महावीर चौक, छत्रपती चौक खंडोबामाळ चौक ते दळवीनगर, एसकेएफ कंपनी ते चापेकर चौक
भोसरी: भोसरी ओव्हर ब्रि ते पीएमटी चौक, भोसरी ओव्हर ब्रिज ते अशोक हॉटेल, माईवडे वाले चौक ते बनाचा ओढा, जय भारत चौक ते आनंदनगर
हिंजवडी: वाकड ब्रिज, वाकड नाका ते इंडियन ऑईल चौक, पुणे बंगळू मार्गातील मायकार शोरुम ते आयटी पार्क रस्ता, साखरे पाटील टी जंकशन चौक ते विप्रो सर्कल चौक, बापुजी बुवा खिंड ते टाटा टी जंक्शन चौक, बंटारा भवन ते सनीज वर्ल्ड चौक, विप्रो फेज 1 ते माणगाव चौक, न्याती शोरुम म्हाळुंगे ते बालेवाडी
सांगवी: राजीव गांधी पूल, रक्षक चौक, काळेवाडी फाटा, तापकरी चौक ते एमएम चौक एम्पायर इस्टेट, कस्पस्टे वस्ती चौक ते सांगवी वाहतूक विभाग, शिवार चौक, कोकणे चौक मार्गे ते नाशिक फाटा, म्हसोबा चौक पिंपळे गुरव व सांगवी फाटा
वाकड: वाकडनाका ते कस्पस्टे वस्ती चौक, बिर्ला हॉस्पीटल ते भूमकर चौक, जिंजर हॉटेल ते सर्व्हिस रस्ता, मायकार शोरुम ते भूमकर चौक, शनिमंदिर ते भूमकर चौक, वाकडगाव ते दत्तमंदिर रस्ता, तापकीर चौक ते थेरगाव फाटा, ताथवडे व पुनावळे अंडरपास मार्ग, सिल्वर स्पून हॉटेल ते संतकृपा बंगला
बावधन: सुसखिंड ते नांदे गाव
पिंपरी: पिंपरी चौक, शगुन चौक रस्ता, भाटनगर कॉर्नर, शगुन चौक ते साई चौक, आर्यसमाज मंदिर ते कराची चौक, शगुन चौक ते डिलक्स चौक, साई चौक ते गेलार्ड चौक
देहूरोड: स्वामी चौक, देहुरोड बाजार, सवाना चौक, मुकाई चौकातून रावेत रस्ता, पुणे-बंगळूर महामार्ग सर्व्हिस रस्ता, मुकाई चौक ते कृष्णा चौक
म्हाळुंगे: हुंडाई सर्कल ते खालुंब्रे
चाकण: शिक्रापूर चाकणमार्गे तळेगाव बाजूकडे, चाकण ते शिक्रापूर मार्ग
दिघी आळंदी: देहुफाटा ते चाकण चौक, चाकण ते वडगाव चौक, वडगाव ते मरकळ चौक, देहुफाटा, धानोरी ते मरकळ चौक, मरकळ गाव ते तुळापूर मार्ग
तळवडे: देहुरोड ते परंडवाल चौक, खंडेलवाल चौक, काळोखे पाटील चौक ते विठ्ठलवाडी ते देहुगांव कमान, टाळकरी कमान ते हॉटेल कॉर्नर परंवडवाल चौक ते देहुगाव,
भोसरी: नाशिकफाटा ते हॅरिस ब्रिज