Gas Shortage Impact Hotels Pudhari
पिंपरी चिंचवड

Gas Shortage Impact Hotels: गॅस टंचाईचा हॉटेल व्यवसायावर फटका; ‌‘नो‌’ वडापाव, समोसा; ओन्ली सँडविच

आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅसपुरवठा खंडित; मेन्यू कमी, दर वाढले, चहाऐवजी कोल्ड्रिंक पर्याय

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: आखाती देशात सुरु असलेल्या युद्धाची झळ देशभरातील हॉटेल, खाणावळी तसेच खाद्यपदार्थ बनविणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना बसली आहे. गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे ऑर्डरमधील मेन्यू कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे कॉर्पोरेट इव्हेंट, बैठका अथवा कार्यक्रमात वडापाव, समोसा, कचोरी या पदार्थांची जागा सँडविच सारख्या पदार्थाने घेतली आहे, तर चहाऐवजी कोल्ड्रिंक अन्‌‍ आईस्क्रीम घेण्याबाबत कॅन्टीन चालकाकडून सुचविले जात आहे.

आखाती देशात सुरु असलेल्या युद्धामुळे गॅसपुरवठा साखळीवर गेल्या दोन आठवड्यांपासून परिणाम झाला आहे. त्यामुळे व्यावसायिक गॅस सिलिंडर पुरवठा तात्पुरता बंद करण्यात आला आहे. त्याचा फटका थेट हॉटेल व्यावसायिक खानावळ चालकांना बसला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत विविध कार्यक्रमांत आयोजित भोजन समारंभातील परवडत नाही. गॅसअभावी कार्डमधील मेन्यू कमी करण्यात आले आहेत. विविध कंपन्यांमध्ये आणि कारखान्यांमध्ये असलेल्या कॅन्टीन मध्ये देखील हीच समस्या कॅन्टीन चालकांसमोरदेखील हीच समस्या आहे.

यापूर्वी सहसा कार्यक्रमानंतर अथवा एखाद्या बैठकीनंतर देण्यात येणारे वडापाव, सामोसा, कचोरी हे पदार्थ ताटातून गायब झाले आहे. आता त्याऐवजी आता सँडविच, बिस्किट, केक हे पर्याय सुचविण्यात येत आहेत. तर, अनेक ठिकाणी चहाऐवजी आईस्क्रीम, कोल्ड्रिंक अथवा सरबताचा वापर केला. त्यामुळे गॅस सिलिंडरअभावी ग्राहकांना इतर पदार्थ देऊन त्यांची ऑर्डर पूण करण्याचा प्रयत्न हॉटेल, कॅन्टीन चालकांकडून करण्यात येत असल्याचे चित्र आहे.

एक वेळचे जेवण

शहरातील विविध खानावळी, कॅन्टीनमधून एक वेळेस जेवण देण्यात येत आहे. त्यामुळे अनेकदा एक वेळचे जेवण हे बाहेर इडली, उत्तप्पा, पोहे अथवा खिचडी वर भागवावे लागते. तर, चहाबरोबरच पाव, खारी खाऊन दिवस काढावा लागतो. सकाळच्या खानावळी अनेक ठिकाणी बंद केले आहेत.

दरात वाढ

गॅस अभावी इलेक्ट्रिक शेगडी, कोळसा आणि लाकडाचा वापर वाढला आहे. मात्र त्यासाठी स्वतंत्र शेगडी, चूल बनवावी लागत आहे. त्यामुळे महिन्याचा खर्च हा 5 ते 7 हजर आणि वाढल्याचे हॉटेल चालक सांगत आहेत. त्यामुळे दरामध्ये दहा ते वीस रुपये वाढ केली आहे.

आमचा व्यवसाय हा सकाळीच असतो. दुसरीकडे गॅस टंचाईमुळे नव्याने इलेक्ट्रिक शेगडी आणि त्याचा कनेक्शन घ्यावे लागले. त्यामुळे नाईलाजास्तव पदार्थांच्या दरामध्ये दहा ते वीस रुपये वाढ करावी लागत आहे.
वीरपेरमल थीवर , डोसा सेंटर, चिंचवड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT