एफडीएचा औषध दुकानांवर वॉच सुरू Pudhari
पिंपरी चिंचवड

GST Medicine Price Reduction: जीएसटीनंतर औषधांचे दर घटले; एफडीएचा औषध दुकानांवर वॉच सुरू

22 सप्टेंबरपासून नवीन दर लागू; लेबलिंग, बिल तपासणीसह जिल्ह्यातील दुकानदारांवर एफडीएची कारवाईची तयारी

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी : नव्या जीएसटी बदलामुळे औषधे, गोळया आणखी स्वस्त होणार आहेत; मात्र याची अंमलबाजवणी करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने तयारी केली असून, जिल्हयातील सर्व औषध दुकांनातून बदलेल्या दरांनुसार औषधांची विक्री केली जाते की नाही यावर एफडीएचा वॉच राहणार आहे. नव्या जीएसटीचा बदल, सिस्टिमच्या बिलाची तपासणी आणि मूळ किंमतीची तपासणी करण्यात येणार आहे. याबाबत दोन सहायक आयुक्तांकडून आढावा घेतला जाणार आहे.(Latest Pimpri chinchwad News)

जिल्हयात मोठ्या संख्येने औषधांची दुकाने आहेत. तसेच, रुग्णालयाशी संलग्न अशा औषध दुकानांवरदेखील अन्न व औषध प्रशासानाची देखरेख असते. दरम्यान, नव्या जीएसटीमुळे सर्व औषधांचा दर हा 5 टक्क्यांवर आणला आहे. तर, काही औषधांचा दर हटवून तो जीएसटी मुक्त करण्यात आली आहेत. त्यामुळे मोठया प्रमाणात दरात बदल झाले आहेत. त्याची सुरुवात 22 सप्टेंबरपासून सुरुवात झाली आहे. तर, काही दुकानादार टप्याटप्प्याने जीएसटी बदलाच्या किंमती अंमलात आणत आहेत.

पुणे विभागसाठी 9 अधिकारी

अन्न व औषध प्रशासन विभागाचे कामकाज हे पुणे जिल्ह्याबरोबरच इतर सातारा, सांगली जिल्ह्यातील दुकानांवरही ‌’वॉच‌’ठेवते. पुणे विभागासाठी या कार्यालयात केवळ 9 अधिकारी आहेत. त्यापैकी एका अधिकाऱ्यांची नुकतीच सेवा समाप्ती झाली आहे.

नव्या जीएसटी निमयानुसार औषधांच्या किमतीत बदल झाले आहेत. अनेक औषध दुकानदारांनी नव्या दराप्रमाणे बदल केला आहे. मूळ किंमतीवर 6.25 टक्क्याने घट झालेली आहे. तर, यापूर्वी असलेली 4 व 12 टक्क्यांची जीएसटी हटवली आहे.
विवेक तापकीर, उपाध्यक्ष पुणे जिल्हा केमिस्ट असोसिएशन
नव्या जीएसटी बदलानंतर दुकानदारांनी बदल केले आहेत. तरी, त्यावर आमची देखरेख असणार आहे. लेबलिंग, सिस्टिम अपडेट याची तपासणी करण्यात येणार आहे. या संबंधित तक्रार असल्यास ती अन्न व औषध प्रशासनाकडे करावी.
गिरीश हुकेरी, सह आयुक्त, अन्न व औषध प्रशासन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT