

पिंपरी: शहर परिसरात सोमवार (दि. 29) पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याने पवना व मुळशी धरणातून विसर्ग कमी करण्यात आला आहे. पवना धरणातून पवना नदीत 1 हजारऐवजी 800 क्युसेक आणि मुळशी धरणातून मुळा नदीत 3 हजार 300 क्युसेकने विसर्ग सुरू आहे.
मावळ तालुक्यातील पवना धरण 100 टक्के भरले आहे. त्यात धरण क्षेत्रात जोरदार पाऊस असल्याने धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पावसाचा जोर कमी झाल्याने विसर्गात घट करण्यात आली आहे. धरणातून 3 हजार 650 क्युसेकने विसर्ग सुरू होता. (Latest Pimpri chinchwad News)
सकाळी दहापासून 800 क्युसेक विसर्ग पवना नदीत करण्यात येत आहे. तसेच, नदीकाठच्या परिसरात पाऊस असल्याने तो पाणी वाढून पवना नदीचे पात्र फुगले असून, पाणी वेगाने वाहत आहे.
मुळशी तालुक्यातील मुळशी धरण 98.33 टक्के भरले आहे. पावसाचा जोर कायम असल्याने धरणातून 7 हजार क्युसेकवरून 3 हजार 300 क्युसेकने मुळा नदीत विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे शहरातून वाहणारी मुळा नदीच्या पात्राच्या पाण्याचा वाढ झाली आहे.
पाणी वेगाने वाहत आहे.दरम्यान, पावसाचा जोर लक्षात घेऊन या दोन्ही धरणातून विसर्ग कमी किंवा जास्त करण्यात येणार आहे. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.