पिंपरी: निवडणूक प्रचाराला वेग धरला असून, प्रत्येक उमेदवारांकडून विविध क्लृप्त्या वापरल्या जात आहेत. त्यातच कार्यकर्त्यांसाठी चमचमीत जेवणासाठी उमपनरांत शाकाहारी- मासांहारी जेवणाच्या पंगती उठत आहे. हॉटेल्सची कूपन अथवा कार्यकर्त्यांकडून नावाची यादी त्या हॉटेलकडे पाठवली जात आहे. विशेष म्हणजे चहा, नाश्तापासून ते रात्रीच्या जेवणाचीदेखील सोय करण्यात आली आहे.
शहरात जवळपास साडेसहाशे उमेदवार रिंगणात आहेत. त्यांचे कार्यकर्ते दिवसभर प्रचारासाठी फिरत असतात. त्यामुळे त्यांच्या पेट्रोल, चहा, नाश्ता, जेवणाची व्यवस्था करावी लागते. यामुळे अगदी वडापाव, पोहेपासून ते रात्रीचे शाकाहारी मांसाहारी जेवणाची पंगती उठत आहेत. तसेच, विविध खानावळी, केटरिंग यांना देखील ऑर्डर देण्यात येत आहे.
अनेक कार्यकर्त्यांना रात्रीचे जेवणाची मागणी ही मासांहार जेवणाची असते. त्यामुळे अनेक उमेदवारांनी शहरातील काही ठिकाणी अशी हॉटेल्स बूक करुन ठेवली आहेत. कार्यकर्त्यांनी त्यासाठी कूपन देण्यात येतात.
ती कूपन हॉटेल मालकाकडे जमा करायची अन् जेवयाचा असे रोजचा दिनक्रम आहे. शहरात जवळपास साडेपाचशे हॉटेल्स आहेत. एका हॉटेलमध्ये सरासरी दोनशे ताटे वाढतात. पण अलीकडे उमेदवारांच्या गर्दीमुळे ती संख्या पाचशे त सातशेच्या घरात गेली आहे.
महिला कायकर्त्यांना दोन वेळा जेवण
प्रभागात प्रत्येक पॅनलमध्ये दोन महिला उमेदवार आहेत. त्यामुळे त्यासाठी महिला कार्यकर्त्यांची देखील संख्या मोठी आहे. त्यामुळे या महिला कार्यकर्त्यांसाठी जेवणाची वेगळी सोय या उमेदवारांना करावी लागत आहेत. त्यासाठी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांच्या शेजारी अथवा प्रभागात एखाद्या हॉल, मंगल कार्यालयात दोन वेळा जेवण दिले जाते.