रेडझोनची हद्द दर्शविल्याने हजारो कुटुंबांना धक्का; डीपीमुळे असंख्य मालमत्ता बाधित File Photo
पिंपरी चिंचवड

Pimpri News: आयुक्तांसह तीनही अतिरिक्त आयुक्त महापालिका भवनात गैरहजर

नागरिकांवर माघारी फिरण्याची वेळ

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: दर सोमवारी नागरिकांना त्यांच्या समस्या थेट महापालिकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांसमोर मांडता याव्यात, यासाठी दुपारी तीन ते सायंकाळी सहा ही वेळ नागरिकांच्या भेटीसाठी राखीव ठेवण्यात येते. मात्र, सोमवारी (दि.21) आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्यासह तिन्ही अतिरिक्त आयुक्त आणि सहआयुक्त गैरहजर होते. यापैकी एकही अधिकारी महापालिका भवनात उपस्थित नसल्यामुळे समस्या घेऊन आलेल्या नागरिकांना परत जावे लागले. त्यामुळे महापालिका भवनात दिवसभर शुकशुकाट होता.

महापालिका भवनात सोमवारी आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील, विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर तसेच, सहआयुक्त मनोज लोणकर यांच्यापैकी एकही वरिष्ठ अधिकारी कार्यालयात उपस्थित नव्हते. (Latest Pimpri News)

विशेष म्हणजे या अधिकार्‍यांच्या अनुपस्थितीबाबत नागरिकांना कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नव्हती. त्यामुळे महापालिकेत आलेल्या नागरिकांना समस्यांचे निराकरण न होता परतावे लागले. आज साहेब आले नाहीत, असे उत्तर कर्मचार्‍यांकडून नागरिकांना देण्यात येत होते. भेटीची वेळ ठरलेली असताना अधिकारी उपस्थित राहत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

डीएमएस प्रणाली ठप्प

महापालिकेचे कामकाज ई-ऑफीसच्या माध्यमातून 1 एप्रिल 2025 पासून ऑनलाईन करण्यात आले आहे. त्यासाठी तब्बल 122 कोटी रुपये खर्च करून ती नवीन संगणक प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र, सोमवारी ही यंत्रणा काही काळासाठी बंद पडली होती. त्यामुळे नागरिकांना ऑनलाईन तक्रारी नोंदवताना त्रास होतो होता. तसेच, उपस्थित अधिकारी व कर्मचार्‍यांना काम करण्यास तासनतास संगणकांसमोर बसावे लागत होते.

दोन अधिकारी रजेवर, दोघे जण बैठकीसाठी बाहेर

अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील आणि सहआयुक्त मनोज लोणकर हे रितसर रजेवर आहेत. तसेच अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे व तृप्ती सांडभोर हे महापालिकेच्या बैठकीसाठी बाहेर होते, असे महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT