दांडियांनी कलरफूल झाली बाजारपेठ; पेन्सिल, बेरिंगच्या दांडिया दाखल Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Dandiya Market: दांडियांनी कलरफूल झाली बाजारपेठ; पेन्सिल, बेरिंगच्या दांडिया दाखल

यंदाच्या नवरात्रोत्सवात पेन्सिल, बेरिंग मेटलच्या आणि मीनावर्क असलेल्या दांडिया बाजारात दाखल झाल्या आहेत.

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: नवरात्रोत्सवाला काही दिवसांचा अवधी राहिला असून सध्या वाढत्या गरबा आणि दांडियाच्या ट्रेंडमुळे तरुणांई दांडिया खरेदी करताना दिसत आहे. लाकडी दांडियांचा जमाना गेला असून आता प्रत्येकजण ट्रेंडी दांडिया खरेदी करत आहेत. यंदाच्या नवरात्रोत्सवात पेन्सिल, बेरिंग मेटलच्या आणि मीनावर्क असलेल्या दांडिया बाजारात दाखल झाल्या आहेत.

पेन्सिल दांडिया

या दांडिया अत्यंत पातळ पण टिकाऊ, भक्कम अशा मेटलच्या स्टिकरसारख्या असतात. याशिवाय याला कोणतीही कलाकुसर केलेली नसते. फक्त प्लेन आणि थोड्या लांब असतात. दिसायला साधा असणारा हा प्रकार तरुणांमध्ये लोकप्रिय आहे. (Latest Pimpari chinchwad News)

दांडियादेखील मेटलच्या दोन स्टिक असतात. दोनपैकी एका जोडाला मध्यभागी बेरिंग लावलेले असते. जेणेकरून दांडिया खेळताना एका बोटात दांडिया अडकवून ती गोलाकार फिरविली जाते. दोन्ही दांडियांची टोके गोलाकार केलेली असतात, जेणेकरून त्याने इजा होत नाही.

संकेडा

संकेडा हा दांडियाचा प्रकार. त्यात अनेक रंगांची जणू उधळण केलेली असते. विविधरंगी लेस लावून दांडियांना सुशोभित केले जाते. तीन आणि दोन रंगाच्या दांडियांचे रंग आकर्षित करणारे असतात. तिरंगा म्हणजे तीन रंगात असलेल्या लाकडी यात वेगळ्या व्हरायटी पाहायला मिळतात. साध्या लाकडाच्यादेखील विविधरंगी आणि प्लॅनदेखील दांडिया बाजारात उपलब्ध आहेत. लहान-मोठ्या लेस लावलेल्या आणि कलरफुल अशा दांडिया दिसायला आकर्षित दिसतात.

मेटल आणि मीनावर्क दांडिया

यंदाचा सगळ्यात हटके असा प्रकार म्हणजे मेटलच्या डिझायनर दांडिया. या दांडियांवर मीनावर्कची सुरेख डिझाईन केलेली असल्याने त्यांचे वेगळेपण उठून दिसते. या दांडियांवर लाल, हिरव्या, पिवळ्या, निळ्या या आकर्षक रंगांची डिझाईन साकारलेली आहे. या दांडिया 100 रुपयांपासून उपलब्ध आहेत. दिसायला सुंदर आणि टिकाऊ असल्याने त्यांना अधिक पसंती दिली जातेय.

ॲल्युमिनिअमच्या दांडिया

ॲल्युमिनिअमच्या डिझाईनवाल्या दांडियांची किंमत 50 रुपयांपासून आहे. तर, मेटलच्या घुंगरू लावलेल्या दांडिया या 60 रुपयांपासून विक्रीस आहेत. सुबक डिझाईन करून लाकडी दांडियांना रंगांचा साज चढवलेला दिसतो.

लहान मुलांसाठी छोट्या दांडिया

लहान मुलांसाठी आता दांडियामध्ये पर्याय उपलब्ध आहेत. या छोट्या दांडियामध्येदेखील विविध व्हारायटी पहायला मिळतात. लाकडी, मेटल, जरीच्या, तिरंगी, मीनावर्कवाल्या दांडिया उपलब्ध आहेत. दांडियांच्या किंमतींमध्ये यावर्षी पाच ते दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच, नवीन आलेल्या डिझायनर दांडियांच्या आणि जुन्या साध्या दांडियांच्या किंमतींमध्ये फरक असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

मीनावर्कच्या दांडिया तरुणांच्या पसंतीस

पिंपरी-चिंचवडच्या बाजारपेठा सध्या दांडियाच्या रंगात रंगल्या आहेत. आपल्याला आवडणाऱ्या ड्रेसेसची खरेदीचा उत्साह नवरात्रीत पाहायला मिळतो. त्यामुळे बाजारपेठादेखील नवरात्रमय झाल्या आहेत. नवनवे दांडियाचे प्रकार बाजारात आलेले पाहायला मिळत आहेत.

बांधणीचे कापड असलेल्या, मणी, झालर यांनी सजलेल्या, दोन-तीन रंगांच्या अशा अनेक वेगळ्या प्रकारांच्या दांडिया बाजारात आल्या आहेत. त्यात यंदा आलेल्या जरीच्या आणि मीनावर्कचे सुरेख डिझाईन असलेल्या दांडिया अनेकांचे लक्ष वेधून घेत आहेत. ॲल्युमिनिअमच्या डिझाईनवाल्या, बेअरिंगच्या फिरणाऱ्या दांडिया, मेटलच्या घुंगरू लावलेल्या दांडिया त्यांचा वेगळेपणा आणि टिकाऊपणा दाखवतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT