Clay Pot Pudhari
पिंपरी चिंचवड

Clay Pot Demand Summer: उन्हाचा कडाका वाढताच पिंपरीत माठांना मागणी

थंड पाण्यासाठी नागरिकांचा पारंपरिक माठांकडे कल; मातीच्या भांड्यांच्या किमतीत 20 टक्के वाढ

पुढारी वृत्तसेवा

खराळवाडी: मार्च महिन्याला सुरुवात झाली असून, उन्हाचा कडाका वाढायला सुरुवात झाली आहे. सामान्य नागरिकांचा पाण्याचा फीज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माठाची मागणी पिंपरी शहर, उपनगरांत वाढत आहे. व्यावसायिकांनी विक्रीसाठी ठेवलेल्या माठांना मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे.

पिंपरी नेहरुनगर, संत तुकारामनगर, वल्लभनगर, मोरवाडी, लालटोपीनगर, मासुळकर कॉलनी, अजमेरा वास्तूउद्योग, यशवंतनगर परिसरात ठिकठिकाणी माठविक्रेते हातगाडीवर माठ विक्रीसाठी जवळच्या वसाहतीतील रस्त्यावर फिरताना दिसतात. सध्या सर्वसामान्य नागरिकांच्या फीजला मागणी वाढत आहे.

उन्हाळ्यात मातीने बनविलेला माठाला मागणी मोठी असते. मात्र, बदलत्या काळानुसार थंडगार पाण्याच्या फीजची जागा सर्वसामान्य नागरिकांच्या मटक्यानी घेतली आहे. आजही माठातील पाणी शुद्ध आणि आरोग्याला उपायकारक ठरत असल्याचा समज अनेकांमध्ये असल्याने घरात थंड पाण्यासाठी माठ वापरला जातो. त्यामुळे पिंपरी शहरात अनेक ठिकाणी मातीचे भांडे व्यासायिकांकडे निरनिराळ्या आकारातील माठ ग््रााहकांसाठी उपलब्ध करून ठेवले आहेत.

हातगाडीवरून होतेय माठांची विक्री

माठ तयार करणे व तो ग््रााहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अनेक व्यावसायिक रस्त्याच्या कडेला स्टॉल लावत आहेत. तर बहुतांश व्यावसायिक नागरिकांपर्यंत पोहोचून माठांची विक्री करत आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणावर त्यांना कष्ट घ्यावे लागत आहेत. रखरखत्या उन्हात नागरिकांना थंड पाणी पिण्यास मिळावे व आपल्या संसाराला दोन पैसे मिळावेत, अशी भावना या विक्रेत्यांच्या मनात आहे. माठ हातगाडीवर पॅक करून दोरीने बांधून जवळ झाडाच्या सावलीत कित्येक वेळा एका ठिकाणी थांबून खऱ्या विक्री केली जात आहे. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत मातीच्या भांड्यांच्या किमतीत वीस टक्क्यांनी वाढ झाली आहे.

उन्हाळ्यात तहान भागविण्यासाठी महागड्या फिज व जार वस्तू खरेदी करण्याऐवजी मातीच्या घागरी, माठ, रांजन अधिक फायदेशीर ठरत आहे. यामुळे आरोग्यदेखील चांगले राहत आहे. फिजमधील अतिथंड पाणी घशाला बाधक ठरते; परंतु माठातील पाणी शरीराला बाधत नाही. यामुळे आम्ही घरी फिज असूनदेखील माठातील पाण्यालाच प्राधान्य देतो.
उषा सिरसाठ, गृहिणी
बाजारात लहान व मोठ्या दोन्ही आकाराचे माठ विक्रीसाठी उपलब्ध आहेत. यात लहान आकाराचे माठ 100 ते 150 रुपयांना आहेत. तर मोठे माठ 250 ते 350 रुपये आणि रांजन 500 ते 800 रुपयांपर्यंत विक्री होत आहेत.
दिनकर पंडित, माठविक्रेते

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT