पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून संपूर्ण शहरात चार सदस्यीय 32 प्रभाग तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. एका प्रभागात 49 हजार ते 59 हजारांचा असणार आहे. वाढत्या मतदार संख्या लक्षात घेता त्यात आणखी भर पडण्याची दाट शक्यता आहे. प्रभाग रचनेचे काम शुक्रवारी (दि.25) तयार होणार आहे, असे महापालिकेच्या अधिकार्यांनी स्पष्ट केले आहे.
आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक विभागाचे सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांचे पथक प्रभाग रचनेचे काम करीत आहे. प्रभाग रचना तयार करण्याच्या कामाने सध्या वेग घेतला आहे. ते काम अंतिम टप्प्यात आले आहे. (Latest Pimpri News)
शहराची सन 2011 ची जनगणना विचार घेऊन प्रत्येक प्रभागातील मतदार संख्या निश्चित करण्यात आली आहे. त्या दृष्टीने प्रगणक गट (ब्लॉक) जुळवून प्रभाग तयार करण्यात आल आहेत. गुगल अर्थ मॅपच्या आधारे नकाशे तयार करण्यात आले आहेत.
आवश्यतेनुसार प्रत्यक्ष स्थळ पाहणीही करण्यात आली आहे. प्रभाग रचनेचे काम अंतिम टप्प्यात असून, तो शुक्रवारी अंतिम केला जाणार आहे. त्या प्रारूप प्रभाग रचनेवर आयुक्तांची स्वाक्षरी झाल्यानंतर तो राज्य निवडणूक आयोगाकडे मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे. त्यांच्याकडून मंजुरी मिळाल्यानंतर त्यावर हरकती व सूचनांची सुनावणी घेतली जाईल.दरम्यान, नवीन प्रभाग रचना फेब्रुवारी 2017 च्या निवडणुकीनुसार असणार असल्याचे सांगितले जात आहे.
सन 2011 लोकसंख्येनुसार प्रभागरचना
पिंपरी-चिंचवड शहराची 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्या 17 लाख 29 हजार 359 आहे. त्यानुसार प्रत्येक प्रभागात किमान 49 हजार आणि कमाल 59 हजार मतदार संख्येचा समावेश केला जाणार आहे. त्यानंतर 15 वर्षांत लोकसंख्येत तसेच, मतदार संख्येत मोठी वाढ झाली आहे.
शहरात 17 लाखांपेक्षा अधिक मतदार आहेत. त्यामुळे प्रत्येक प्रभागात मतदार संख्या वाढणार असल्याचे दिसत आहे. एक जुलै 2025 ची मतदार यादी महापालिका निवडणुकीसाठी ग्राह्य धरली जाणार आहे. त्यानुसार त्या मतदार याद्या राज्य निवडणूक आयोगाकडून मागविण्यात आल्या आहेत. मतदार याद्या प्राप्त झाल्यानंतर त्या प्रभागनिहाय फोडल्या जाणार आहेत, असे अधिकार्यांनी सांगितले.
प्रारूप प्रभागरचना प्रसिद्धीनंतर हरकती, सूचना
प्रारूप प्रभाग रचनेच्या मसुदा शुक्रवार (दि.25) पर्यंत तयार केला जणार आहे. आयुक्तांच्या स्वाक्षरीनंतर तो प्रारूप प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविला जाईल. आयोगाकडून प्रभाग रचनेला मान्यता मिळाल्यानंतर प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाईल. त्यावर हरकती व सूचना स्वीकारल्या जातील. राज्य निवडणूक आयोगाने अंतिम केलेली प्रभाग रचना प्रसिद्ध होईल, असे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांनी