Childbirth PCMC Pudhari
पिंपरी चिंचवड

Childbirth PCMC: अविवाहिता घरातच बाळंत; दोघांचाही मृत्यू

घरात प्रसूतीनंतर प्रकृती बिघडली; रुग्णालयात हलवल्यानंतर दोघांचाही जीव गेला

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी : अविवाहित तरुणी घरातच बाळंत झाली. दरम्यान, नवजात बाळ रावेत आणि तरुणीला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, दोघांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. 24) चिंचवड येथे उघडकीस आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड येथे राहणारी 22 वर्षीय अविवाहित तरुणी अज्ञातापासून गरोदर होती. दरम्यान, मंगळवारी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास ती बाळंत झाली. त्यानंतर तरुणीची प्रकृती अचानक खालावली. तिला उपचारासाठी रावेत येथील एका खासगी रुग्णालयात बाळासह दाखल करण्यात आले.

तिथे प्राथमिक उपचार घेतल्यानंतर तरुणीला पुढील उपचारासाठी पुणे येथील ससून हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. दरम्यान, बाळाचीदेखील प्रकृती खालावल्याने डॉक्टरांनी त्याला पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले.

मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास वायसीएम रुग्णालयात बाळाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. तसेच, तरुणीचीही प्रकृती आणखी खालावल्याने तिचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. चिंचवड पोलिस तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT