पिंपरी: पिंपरीतील हाफकीन संस्थेच्या सुधारणांसाठीचा निधी, साधनसामुग््राी आणि निवासी खोल्यांचे डागडुजीचा विषय मार्गी लावण्यात येणार आहे. यासाठी लवकरच स्वतंत्र बैठकीचे आश्वासन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.
संस्थेचे जागेच्या व्यावसायिक वापरासंबंधीचा प्रस्ताव नाकारुन आर्थिक सहाय्यासाठी राज्य शासनाने सकारात्मकता दाखवली आहे. पिंपरी-चिंचवड येथील हाफकीन जीव औषध निर्माण महामंडळास पालकमंत्री अजित पवार यांनी रविवार (दि. 21) भेट दिली. (Latest Pimpari chinchwad News)
यावेळी महापालिका आयुक्त शेखर सिंह, हाफकीन व्यवस्थापकीय संचालक सुनील महिंद्रकर, महाव्यवस्थापक डॉ. प्रदीप धिवर, पिंपरी-चिंचवड संस्थेचे व्यवस्थापक डॉ. बाबासाहेब कुहे आदी उपस्थित होते.
आठ दिवसांपूर्वीच अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी या संस्थेला भेट दिली होती. त्याबाबत अधिकारी, कर्मचारी यांनी आपल्या व्यथा मांडल्या होत्या. त्याची दखल घेवून पालकमंत्री पवार हे रविवारी भल्या पहाटेच हाफकीन संस्थेमध्ये दाखल झाले होते. त्यांनी संस्थेची माहिती घेत आढावा घेतला.
प्रशस्त जागा, चांगली उत्पादन क्षमात असूनही निधी अभावी मर्यादा येत असल्याचे अधिकायांनी नमूद केले. तसेच, याबाबत जागेचा व्यावसायिकरणासाठी वापर करण्याचा प्रस्ताव देखील समोर मांडला. मात्र, तो फेटाळण्यात आला असून, याविषयावर स्वतंत्र बैठक घेण्याचे आश्वासन पालकमंत्री पवार यांनी दिले.
याबाबत बोलताना महिंद्रकर म्हणाले की, हाफकीन संस्थेची पिंपरी येथील प्रकल्पाबाबत काही बदल व सुधारण करणे आवश्यक आहे. त्याची सविस्तर माहिती देण्यात आली. त्यासाठी विविध योजना आणि मदत करण्याचे आश्वासन दिले. कर्मचाऱ्यांची निवासस्थाने जुनी झाली आहेत. त्याबाबत दुरुस्तीचे नवीन निवीदा काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. निधीसाठी सकारात्मक दिली असल्याने लवरकच सर्व कामे मार्गी लागतील.
मेट्रोच्या कामाचा आढावा
पिंपरी-चिंचवड शहरातील निगडीपर्यंतच्या मेट्रोच्या कामाचा आढावा घेण्यात आला. फुगेवाडी येथील मेट्रोच्या कार्यालयात भेट घेवून अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. भक्ती-शक्ती चौक, निगडी ते चाकण दरम्यान होणाऱ्या मेट्रो मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवालाचे या वेळी पीपीटी सादरीकरण करण्यात आले; तसेच मेट्रो मार्गात येणाऱ्या विविध शासकीय संस्थांच्या अडचणींबाबत चर्चा करण्यात आली.