

पिंपरी: पिंपरी फळ बाजारात फळांची आवक वाढली असून फळांचे दर स्थिर आहेत. फळांचे दर 100 ते 150 रुपये प्रतिकिलो आहेत. सीताफळाची आवक वाढली असून 100 - 150 रुपये दोन किलो दर होता.
सफरचंद आणि डाळींबाचे दर कमी झाले आहेत. सफरचंद 150 रुपये दीड किलो दराने तर डाळींब 100 - 150 रुपये किलो दराने उपलब्ध आहेत. (Latest Pimpari chinchwad News)
केळी 60 ते 70 रुपये डझन दर आहे. संत्री 100 - 150 रुपये किलो, मोसंबी 100 - 150 रुपये किलो, ड्रॅगफ्रुट 100 - 150 रुपये किलो, पपई 60 रुपये किलो दराने आहेत. इतर फळांचे दर गेल्या आठवड्याप्रमाणे स्थिर आहेत. नवरात्रीमुळे फळांना मागणी वाढली आहे.
फळांचे दर प्रतिकिलो पुढीलप्रमाणे
देशी सफरचंद 200 - 250 रुपये, तर मोसंबी 120, संत्री 160, डाळिंब 100 रुपये, पेरू 50, पपई 60, 70, अननस 120, केळी 70 रुपये डझन, किवी 120, नाशपती 120, आलुबुखार 150 रुपये किलो दराने विक्री केली जात आहे.