Pilot Dies LATAM Airlines 
Latest

Pilot Dies : विमानाच्या बाथरूममध्ये वैमानिकाला हृदय विकाराचा झटका; सहवैमानिकांकडून आपत्कालिन लँडिंग

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : Pilot Dies : विमानाच्या बाथरूममध्ये वैमानिक एकाएकी कोसळला. वैमानिकाला हृदय विकाराचा तीव्र झटका आल्याचे समजताच सहवैमानिकांनी पनामा विमानतळावर 271 प्रवाशांसह आपत्कालिन लँडिंग केले. ही घटना मियामी ते चिली व्यावसायिक विमानाच्या सँटियागोला जाणाऱ्या LATAM एअरलाइन्सच्या फ्लाइटमध्ये घडली. दरमयान, वैमानिकाला तातडीचे उपचार देण्यात आले. मात्र, त्याचा जीव वाचवता आला नाही. कमांडर इव्हान आंदौर असे या वैमानिकाचे नाव आहे.

Pilot Dies : टोकुमेन विमानतळावर आपत्कालिन लँडिंग

LATAM एअरलाइन्सचे एक व्यावसायिक विमान 271 प्रवाशांसह सँटियागोला निघाले होते. दरम्यान रविवारी रात्री फ्लाइटचा मुख्य वैमानिक कमांडर इव्हान आंदौर (वय 56) हा विमानाच्या बाथरूममध्ये अचानक कोसळला. (Pilot Dies)सहवैमानिकांना हे समजताच त्यांनी तिथे धाव घेतली. त्यांना इव्हानला हृदय विकाराचा तीव्र झटका आल्याचे समजले. त्यामुळे त्यांनी जवळच्या पनामा शहरातील टोकुमेन आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालिन लँडिंग केले. तत्पूर्वी विमानातील प्रवाशांमध्ये कोणी डॉक्टर असेल तर त्यांना मदतीचे आवाहन केले. एकूण 40 मिनिटांत या सर्व घडामोडी घडल्या.

विमानातील एका प्रवाशाने या 40 मिनिटांमधील वृत्तांत सांगितला. दरम्यान, विमान लँडिंग करत असताना इसाडोरा नावाची एक परिचारिका तसेच प्रवाशांमधील दोन डॉक्टरांनी वैमानिकांच्या मदतीसाठी धाव घेतली. त्यांनी वैमानिक इव्हानला वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही. दरम्यान विमान लँड करताच वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी तातडीने परिस्थिती हाताळायला घेतली. मात्र इव्हान यांना वाचवता आले नाही. इव्हान यांना मृत घोषित करण्यात आले.

Pilot Dies : पनामा शहरातील हॉटेल्समध्ये प्रवाशांची सोय

या घटनेमुळे पनामा शहरातील टोकूमेन विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावे लागल्याने प्रवाशांची शहरातील हॉटेल्समध्ये राहण्याची सोय करण्यात आली. मंगळवारी ही विमानसेवा पूर्ववत झाली.

LATAM एअरलाइन्सने घटनेबाबत सांगितले की, इव्हान यांना वाचवण्यासाठी एअरलाइन्सकडून सर्व स्थापित प्रोटोकॉल्सचे पालन करण्यात आले. मात्र, खेदाची गोष्ट आहे की आपत्कालिन लँडिंग आणि त्वरित वैद्यकीय मदत मिळूनही इव्हान अंदौर यांना वाचवता (Pilot Dies) आले नाही. LATAM ग्रुपने या दुर्दैवी घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले तसेच शोक व्यक्त करत वैमानिक इव्हान यांच्या शोकाकुल कुटुंबाला सांत्वन दिले.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT