Latest

पेट्रोल, डिझेलची गळती छोटी असली, तरी मोठ्या आपत्तीला निमंत्रणच

निलेश पोतदार

राजेंद्रप्रसाद मसूरकर

मुंबई : वाहने का पेटतात, या प्रश्नाचे उत्तर शेवटी वाहन चालवणार्‍यापर्यंत येऊन थांबते. तुम्ही गाडी पार्क करता ती जागा कधी तपासली आहे का? गाडी काढली की, सुसाट निघून जाण्याची आपली सवय. पण गाडी जिथे पार्क करता तिथे खाली तेलाचे चार-दोन थेंब सतत पडत असतील तर समजा, तुम्ही कोणत्याही क्षणी आगीला निमंत्रण देत आहात.

गाडीची काळजी कशी घ्यावी, हेही शिकणे आवश्यक झाले आहे. गाडीची मूलभूत माहिती नसल्यानेच गाडीतून तेल गळत राहते आणि मग अकस्मात भडका उडतो, अशी असंख्य उदाहरणे सांगता येतील.

पेट्रोल अथवा डिझेलची टाकी, तिथून इंजिनपर्यंत इंधन वाहून नेणार्‍या नळ्या यांच्या गळतीची वेळोवेळी तपासणी करावी. नुकतीच गळती सुरू होते, तेव्हा त्या ठिकाणी धूळ बसू लागते. गाडीची साफसफाई करताना अशी धूळ पाहिल्यावर नुसती साफ करून थांबू नका. गळतीची सुरुवात असेल तर दुरुस्ती करता येते.

इंधन फुकट घालवाल तर… 

डिझेल गाड्यांप्रमाणे अलीकडे पेट्रोल वाहनांनाही फ्युएल इंजेक्शन पद्धत आहे आणि तीमध्ये इंजेक्टरपर्यंत न गेलेले इंधन टाकीकडे परत पाठविण्यासाठी 'रिटर्न पाईप' असतात. त्यात गळती झाल्यास तो रिटर्न पाईप आहे, त्याने काही प्रॉब्लेम होत नाही', असे म्हणून कानाडोळा करू नका. त्याने इंजिन चालण्यास प्रॉब्लेम येत नसला तरी गळती वाढून वाहन पेट घेण्याचा धोका दडलेला असतो.
इंधनाच्या गळतीकडे केवळ 'पेट्रोल/डिझेल फुकट गेले' एवढ्याच नजरेने पाहणे चुकीचे आहे. आर्थिक नुकसान होतेच; पण धोकाही संभवतो. (लेखक ज्येष्ठ वाहनतज्ज्ञ आहेत)

ज्वालाग्राही पदार्थांचा साठा 

पेट्रोल, डिझेल किंवा चटकन पेट घेणार्‍या पदार्थांची गाडीतून वाहतूक अथवा साठा करणे धोक्याला निमंत्रण देणारे असते.
गाडीत चुरगळलेले कागद, तेलकट कापड, यांसारख्या वस्तू ठेवणेही धोकादायक आहे. एखादी ठिणगी पडल्यास या वस्तू पेट घेऊ शकतात.

गाडीमध्ये अ‍ॅश ट्रे दिला तरी गाडीत धूम्रपान करणे धोक्याचेच ठरते. टायर गरम होणे धोकादायक न थांबता सलग तीन-चार तास गाडी चालविल्यास टायर गरम होतात. हे टाळण्यासाठी दोन-सव्वादोन तासांनी गाडीला विश्रांती द्यावी. भरधाव वेगात वळण घेताना प्रचंड घर्षणामुळे टायरची उष्णता वाढून अनर्थ ओढवू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT