assembly results 2022 manipur 
Latest

मणिपूर : ‘शांती-विकासासाठी भाजपचे बहुमताने सरकार यावे’

स्वालिया न. शिकलगार

इंफाळ : पुढारी ऑनलाईन :  हिंगांग विधानसभा जागा (Heingang Vidan Shaba सीट) साठी २८ फेब्रुवारी, २०२२ रोजी मतदान झाले. आतापर्यंत, समोर आलेल्या कलानुसार, भाजपचे उमेदवार आणि मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग नेतृत्व करत आहेत. ही जागा मणिपूरच्या इम्फाळ पूर्व जिल्ह्यांतर्गत येते. हिंगण जागा ही व्हीआयपी सीट आहे. कारण येथूनच मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग (भाजप उमेदवार एन. बिरेन सिंग) निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि ते यंदाच्या निवडणुकीत आपले नशीब आजमावत आहेत. दरम्यान, ५ वर्षात शांती-विकासासाठी भाजपचे बहुमताने सरकार यावे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांनी प्रसारमाध्यमांशी दिली.

हिंगांग ही जागा मणिपूर लोकसभा अंतर्गत येते. या लोकसभा मतदारसंघातून भाजपचे राजकुमार रंजन सिंह खासदार आहेत.

राजकीय समीकरण

२०१७ च्या निवडणुकीत, मणिपूरचे विद्यमान मुख्यमंत्री, नोंगथोम्बम बिरेन सिंग हे हिंगांग मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. एन. बिरेन सिंग (एन. बिरेन सिंग) ते या जागेवरून सलग ४ वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. २०१७ च्या निवडणुकीत त्यांनी तृणमूल काँग्रेसचे पी. शरदचंद्र सिंह यांचा पराभव केला.

हिंगांग विधानसभेचे निकाल

२०१७ च्या मणिपूर विधानसभा निवडणुकीच्या आधी एन. वीरेन सिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. निवडणुकीत त्यांनी Hingang विधानसभा जागेवर टीएमसीचे पी. शरदचंद्र सिंह यांचा १ हजार २०६ मतांनी पराभव केला. २०१७ च्या निवडणुकीत एन. वीरेन सिंह यांना एकूण १० हजार ३४९ मते मिळाली. तर शरदचंद्र सिंह यांना ९ हजार २३३ मते मिळाली.

२०१२ च्या निवडणुकीत एन. बिरेन सिंग काँग्रेस पक्षात होते. या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एन. रतन कापू यांनी मीतेई यांचा २ हजार ८२ मतांनी पराभव केला. या निवडणुकीत बिरेन सिंह यांना एकूण ११ हजार ८७२ मते मिळाली. तर राष्ट्रवादीच्या उमेदवाराला ९ हजार ७९० मते मिळाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT