नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करीत असलेल्या एका प्रवाशाने क्रू सदस्यांना शिवीगाळ करण्याचा तसेच त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. दिल्ली विमानतळावर विमान उतरल्यानंतरही संबंधित प्रवाशाची अरेरावी सुरु होती, असे एअर इंडियाच्या प्रवक्त्याकडून सांगण्यात आले.
दरम्यान एअर इंडियाने या घटनेबाबत हवाई वाहतूक महासंचलनालयाकडे अहवाल सादर केला आहे. एअर इंडियाच्या एआय 882 विमानात गत सोमवारी हा प्रकार घडला. शिवीगाळ, अरेरावी आणि क्रू सदस्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केलेल्या या प्रवाशाला नंतर विमानतळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. याआधीही 10 मे रोजी एअर इंडियाच्या विमानात असा प्रकार घडला होता. त्यावेळी लंडनहून दिल्लीकडे येत असलेल्या विमानात जसकिरत पड्डा नावाच्या इसमाने दोन महिला क्रू सदस्यांवर हल्ला केला होता.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.