Latest

MPs’ Suspension : मला शहाणपण शिकवू नका: निलंबनावरून नायडूंनी सुनावले

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क

विरोधी पक्षांच्‍या १२ खासदारांवर करण्‍यात आलेले निलंबनाची कारवाई ( MPs' Suspension ) योग्‍यच आहे. कोणत्‍याही परिस्‍थितीत ही कारवाई मागे घेण्‍यात येणार नाही, असे राज्‍यसभेचे सभापती व्‍यंकय्‍या नायडू यांनी आज स्‍पष्‍ट केले. सभागृहाचा अवमान होईल, असे वर्तन करणार्‍या सदस्‍यांना निलंबित करण्‍याचा राज्‍यसभा सभापतींना अधिकार आहे, असेही ते म्‍हणाले.

या खासदारांनी काय वर्तन केले आहे ते मला माहीत आहे, त्यामुळे मला शहाणपण शिकवू नका, अशा शब्दांत राज्यसभेचे सभापती व्यकय्या नायडू यांनी मल्लिकांर्जुन खरगे यांना सुनावले. काहीही जाले तरी निलंबन मागे घेतले जाणार नाही, असे निक्षून सांगितले.

खासदारांच्‍या गदारोळावर बोलताना नायडू म्‍हणाले, पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाच्‍या सदस्‍यांनी केलेल्‍या वर्तनाची आठवण झाली तरी भीती निर्माण होते. या घटनेचे सभागृहातील ज्‍येष्‍ठ नेते समर्थन करणार नाहीत, अशी अपेक्षा मी व्‍यक्‍त करतो, मागील अधिवेशन काळात विरोधक सहकार्य करतील, असे वाटत होते. मात्र दुर्दैवाने असे झालं नाही, असेही ते म्‍हणाले. ११ ऑगस्‍ट २०२१ रोजी राज्‍यसभेतील विरोधी पक्ष सद्‍यांनी सर्व मर्यांदाचे उल्‍लंघन केले होते. उपसभातपींनी विरोधी पक्षाच्‍या सदस्‍यांना वारंवार सूचना केल्‍या, मात्र कोणीच ऐकले नाही, असेही ते म्‍हणाले.

मंगळवारी सभागृहाचे काम सुरु झाल्‍यानंतर १२ खासदारांचे निलंबन ( MPs' Suspension ) रद्‍द करावे, अशी मागणी विरोधी पक्ष नेते मल्‍लिकार्जुन खर्गे यांनी केली होती. सरकारची कारवाई नियमबाह्य असल्‍याचा दावा त्‍यांनी केला होता. निलंबनाची कारवाई कायम राहणार, असे व्‍यंकय्‍या नायडू यांनी स्‍पष्‍ट केल्‍यानंतर विरोधी पक्षाच्‍या सदस्‍यांनी सभात्‍याग केला.

हेही वाचलं का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT