पुढारी ऑनलाईन – मुलांच्या भवितव्याचा विचार करून, पालकांनी अहंकार बाजू ठेवला पाहिजे, असा सल्ला मद्रास उच्च न्यायालयाने घटस्फोटासाठी कोर्टात याचिका दाखल केलेल्या जोडप्याला दिला आहे. Ego हा तीन अक्षरी शब्द Relationship हा १२ अक्षरांचा शब्द नष्ट करू शकतो, कारण अहंकार आणि प्रेम एकत्र प्रवास करू शकत नाहीत, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. (Shut down egos for Children)
न्यायमूर्ती एस. वैद्यनाथन आणि सी. सर्वानन यांनी म्हटले आहे की जोडप्यांनी कटुता आणि अहंकार बाजूला ठेवला पाहिजे, अशा गोष्टींचा मुलांच्या मानसिकतेवर वाईट परिणाम होतो.
एका महिलेने नवऱ्याविरोधात याचिका दाखल केली आहे. नवऱ्याने ४ वर्षांच्या मुलाचे अपहरण केले आहे, असा आरोप या महिलने केला आहे. न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे. दुसऱ्या बाळतंपणासाठी माहेरी जाण्यापूर्वी या महिलेने स्वतःच मुलाला वडिलांकडे सोडले होते, हे न्यायालयाच्या निदर्शनास आल्याने ही याचिका फेटाळण्यात आली.
न्यायालयाने म्हटले आहे, "मुलगा २०२०पासून वडिलांसोबत आहे, तेव्हा याचिकाकर्ती महिला तिच्या पालकांच्या घरी गेली होती. हा ताबा बेकायदेशीर नाही. आता नवऱ्याने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे, त्यामुळे ही महिला मुलाचा ताबा मिळण्यासाठी दाद मागू शकतात."
हेही वाचा