Oscar 
Latest

Oscar : ६२ वर्षांचा रेकॉर्ड तुटणार, यंदा रेड कार्पेट नाही तर…

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : हॉलीवूड असो वा बॉलीवूड, ॲवॉर्ड सेरेमनी त्यास खूप महत्व असतं. कोणत्याही ॲवॉर्ड शोमध्ये रेड कार्पेटचे खूप महत्व असतं. ॲवॉर्ड सेरेमनीच्या रेड कार्पेटवर स्टार्स चमकत राहतात. सेलेब्रिटींचे रेड कार्पेटवरील वॉक आणखी खास बनवतात. त्यांचे लूक आणि ड्रेसिंग स्टाईल सर्वांचेच लक्ष वेधून घेतात. जर ऑस्कर ॲवॉर्ड समारंभाविषयी बोलायचे झाले तर जगभरातील स्टार्सची क्रेज रेड कार्पेटवर पाहायला मिळते. ऑस्कर ॲवॉर्ड समारंभात रेड कार्पेटवर स्टार्स आपला जलवा दाखवण्यात कुठलीही कमी ठेवत नाहीत. रेड कार्पेटवर वॉक करणाऱ्या स्टार्सवर सर्व कॅमेऱ्यांच्या नजरा वळलेल्या असतात. पण, यावेळी तुम्ही ऑस्करमध्ये रेड कार्पेट पाहू शकणार नाही. कारण रेड कार्पेटचा रंग आता बदलणार आहे.

काय झाला बदल?

१९६१ पासून सुरु झालेल्या ऑस्करच्या सोहळ्यापासून प्रत्येक वर्षी रेड कार्पेट असतेच. ६२ वर्षांची ही परंपरा आता बदलणार आहे. ऑस्करचे आयोजन करणारी ॲकेडमी ऑफ मोशन पिक्चर्सने यावेळी रेडच्या जागी ग्लॉसी व्हाईट कलरची निवड केलीय. इंग्रजीत 'शॅम्पेन'च्या नावाने प्रसिद्ध हा कलर कार्पेट ॲवॉर्ड शोजमध्येही दिसणार आहे.

‍ऑस्कर ॲवॉर्ड्सचे आयोजन १२ मार्चला लॉस एंजिलिसमध्ये होणार आहे. ऑस्करचा होस्ट जिमी किमेलने हॉलीवूडच्या डॉल्बी थिएटरमध्ये कार्पेट लॉन्च केलं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT