gauri khan  
Latest

Gauri Khan : आर्यनच्या अटकेवर गौरी खानने सोडले मौन

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि गौरी खानचा मुलगा आर्यन खान गेल्या वर्षी एका ड्रग्स केसमुळे चर्चेत आला होता. आर्यनला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एका क्रूझच्या ड्रग्ज प्रकरणात अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल केल्या होता. या प्रकरणाची कोर्टात अनेकवेळा सुनावणी झाली आणि अथक प्रयत्नानंतर आर्यनला जामीन मिळाला. यावेळी अनेक अडचणींचा सामना खान कुटुंबियांना करावा लागला. याच दरम्यान आर्यनची आई गौरी खानने (Gauri Khan ) पहिल्यांदा ड्रग्स प्रकरणाबाबतचा खुलासा केला आहे.

प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर याचा नुकताच कॉफी विथ करण-७ हा शो पार पडला. या शोच्या एका भागात गौरी खान, भावना पांडे आणि माहीप कपूर या स्टार्सनी हजेरी लावली होती. यात गौरी खानला गंमतीने करणने 'तू मुलगी सुहानाला कोणती डेटिंग टीप देशील?' अशा प्रश्न विचारला. यावर गौरी म्हणाली की, 'कधीच एकाच वेळी दोन मुलांना डेट करु नकोस.' गौरीच्या उत्तरानं सेटवरील कलाकारांसह चाहत्याचे लक्ष वेधलं गेलं. यानंतर गौरीला (Gauri Khan) एक आई म्हणून आर्यन खानला क्रुझ ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आल्यावर काय वाटले अशा प्रश्न विचारण्यात आला.

या प्रश्नाचं उत्तर देताना पहिल्यांदाच गौरी खानने सांगितले की, 'आम्ही ज्या परिस्थितीतून गेलो आहोत त्यापेक्षा अत्यंत वाईट काहीही असू शकत नाही. पण आम्ही कुटुंब म्हणून एकत्रित ठामपणे उभे राहिलो. या कठीण काळात एकमेकांचे चांगले सहकारी बनलो. एकमेकांचा आदर केला आणि धिराने या प्रकरणाचा सामना केला. या प्रकरणात आम्हाला अनेकांचे प्रेम मिळाले. या कठीण काळात आम्ही काही लोकांना ओळखत नव्हते ते सुद्धा आमच्यासोबत होते. यामुळे सर्वाच्या मदतीने आम्ही यातून बाहेर पडत आहोत. या प्रकरणात ज्या- ज्या लोकांनी आम्हाला मदत केली त्या सर्वाचे मी आभारी मानते.'

आर्यनला ऑक्टोबर २०२१ मध्ये क्रुझ ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यानंतर आर्यनला अनेक दिवस आर्थर रोड तुरुंगात काढावी लागली. अथक प्रयत्नानंतर या प्रकरणातून आर्यनला जामीन मिळाला. शेवटी एनसीबीला आर्यनविरुद्ध ठोस पुरावे न मिळाल्याने त्याची या प्रकरणातून मुक्तता करण्यात आली. या दरम्यान सोशल मीडियावर आर्यनला ट्रोलदेखील करण्यात आलं होतं. सध्या परिस्थिती ठीक असून आर्यन खान त्याच्या कामात बिझी आहे.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT