Latest

BS Yediyurappa: कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा बालंबाल बचावले, हेलिकॉप्टर लँडिंगवेळी अडथळा

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन: भाजपचे ज्येष्ठ नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांचे हेलिकॉप्टर लँडिंगच्या ठिकाणी निष्काळजीपणाचे प्रकरण समोर आले आहे.  कलबुर्गी येथील हेलिकॉप्टर लँडिंगदरम्यान आज (दि.०६) अडथळा निर्माण झाला.  लँडिंगदरम्यान  मैदानाच्या सर्व बाजूला प्लास्टिक पोती, घराब कपडे आणि कागदाचे कपटे पसरलेले असल्याने पायलटला लँडिंग करणे कठीण झाले. धुळ आणि वाऱ्यामुळे उडालेल्या कचऱ्यामुळे हवेची दृश्यमानता बिघडली होती. त्यामुळे पायटला न दिसल्याने हेलिकॉप्टर लँडिंग करता आले नाही.

लँडिंग करताना आलेल्या अडचणीमुळे येडियुरप्पा यांच्या हेलिकॉप्टरचे लँडिंग शेवटच्या क्षणी रद्द करावे लागले. यानंतर मैदान साफ केल्यानंतरच हेलिकॉप्टर मैदानात सुरक्षितपणे उतरविण्यात आले. पायलटच्‍या सावधानतेमुळे मोठी दुर्घटना टळली, अशी माहिती सूत्रांनी दिली. .

दरम्यान कर्नाटकात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री विजय संकल्प यात्रेत सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी ही संपूर्ण घटना घडली. नंतर तेथून कचरा हटवल्यानंतरच पायलटने हेलिकॉप्टर उतरवल्याचे देखील कर्नाटक पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT